चर्चेआधी शेतकऱ्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, आजच्या बैठकीत तोडगा निघणार ?
कडाक्याची थंडी आणि पावसाला ही न जुमानता मागील अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहे. शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहे. तर सरकारने कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीशिवाय कुठल्याही प्रस्तावावर विचार करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये आज पुन्हा एकदा बैठक होणार आहे. दुपारी 2 वाजता होणाऱ्या या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे.
तीनही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याची प्रक्रिया निश्चित करावी, तसेच किमान आधारभूत मूल्याच्या कायद्याची हमी द्यावी, या दोन प्रमुख मागण्यांवर शेतकरी संघटना अजूनही ठाम आहेत. तर दुसरीकडे, तिन्ही नवीन कृषी कायदे मागे घेण्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रस्तावावर विचार करण्यास सरकार तयार असल्याचे, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आजच्या चर्चेच्या आधी शेतकऱ्यांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. दिल्लीच्या परिघावरील पूर्व आणि पश्चिम महामार्गावर ५ हजार ट्रॅक्टरसह शेतकरी रस्त्यावर उतरल्याचा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला. या ट्रॅक्टर मोर्चाद्वारे दीर्घकाळ आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी संघटनांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या : –
शेतकरी आंदोलन: हरियाणातील महिलांनी रॅलीचे नेतृत्व करत ट्रॅक्टरचे स्टेअरिंग घेतले हाती
दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत वाल, घेवड्याच्या दरात सुधारणा
शेतकरी – सरकारमधील चर्चा पुन्हा निष्फळ, 8 जानेवारीला पुढची बैठक
… अन् शेतकऱ्यांनी भाजप नेत्याच्या घरासमोर टाकले शेण
रब्बी ज्वारीची सुधारित लागवड पद्धत