
महिंद्राच्या जाहिरातीची जोरदार चर्चा, एकदा व्हिडीओ नक्की पाहा
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. भारतात मुंबईत 8 मार्च हा महिला दिवस 1943 मध्ये साजरा केला गेला.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ट्रॅक्टर कंपनी महिंद्रा कंपनीची जाहिरात देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर आनंद महिंद्रा नेहमीच एक्टिव्ह असलेले पाहायला मिळतात. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिंद्रा कंपनीची एक जाहिरात सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरली असल्याचे पहायला मिळत आहे. सोशल मीडियावर जाहिरातीचं विशेष कौतुक करण्यात येत आहे. जाहिरातीची थीम ‘आसान होता तो हर कोई किसान होता!’, अशी ठेवली आहे.
या व्हिडीओची संकल्पना ही ट्रॅक्टरसाठीचं लायसन्स मिळवण्यासाठी लागणाऱ्या ड्रायव्हिंग टेस्ट अशी ठेवण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये शक्ती नावाची तरुणी आणि आरटीओ विभागाचा अधिकारी यांच्यातील संवाद दाखवण्यात आला आहे.आरटीओ अधिकारी तरुणीला ट्रॅक्टरची ड्रायव्हिंग टेस्ट देणं आसान नही होगा, असं म्हणतो. त्यावर शक्ती नावाची तरुणी आसान होता तो हर कोई किसान होता!, असं म्हणते. सोशल मीडियावर जाहिरातीचं विशेष कौतुक करण्यात येत आहे. व्हिडिओच्या माध्यमातून महिंद्रा ग्रुपकडून महिला दिनानिमित्त महिलांच्या प्रती असणारा दृष्टिकोन बदलणं आणि शेतकऱ्यांच्या कार्याला सलाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या : –
लहान बोर खाण्याचे मोठे फायदे जाणून घ्या
पंतप्रधान किसान योजनेत मोठा बदल, ही माहिती नक्कीच वाचा
उसाची शेती सोडून शेतक्यांनी सुरु केली केळीची लागवड
विदर्भातील वातावरणात आर्द्रता मोठ्या प्रमाणावर घटली
लाल मिरचीचे भाव घसरण्याची शक्यता, व्यापाऱ्यांची लगबग सुरू