… म्हणून राज्यपाल शेतकऱ्यांना भेटू शकले नाहीत, राजभवनाचे स्पष्टीकरण
कृषी कायद्याच्या विरोधात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले. आझाद मैदानात सभा झाल्यानंतर शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटून निवेदन देणार होते. मात्र शेतकऱ्यांची राज्यपाल कोश्यारी यांच्याशी भेट होऊ शकली नाही. कलाकारांपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांना भेटणारे राज्यपाल शेतकऱ्यांना न भेटल्याने त्यांच्यावर सर्वांनी टीका केली होती.
चारही बाजूने टीकेची झोड उठल्याने अखेर आता राजभवनाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तसेच राज्यपाल शेतकऱ्यांना का भेटू शकले नाही, याचे कारण सांगितले आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. ते सोमवारी गोवा विधान सभेच्या प्रथम सत्राला संबोधित करणार असल्याने राज्यपाल महोदय त्या दिवशी शेतकरी शिष्टमंडळास भेटू शकले नाहीत, असे राजभवनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच, राज्यपालांची भेट होऊ शकणार नाही, याची पूर्वकल्पना देण्यात आल्याचे देखील राजभवनाने म्हटले आहे.
संयुक्त शेतकरी मोर्चाचे धनजंय शिंदे यांना 22 जानेवारी रोजी दुरध्वनीव्दारे तसेच निमंत्रक श्री प्रकाश रेडडी यांना 24 जानेवारीला पत्राद्वारे राज्यपालांच्या अनुपलब्धतेविषयी कळविण्यात आले होते. त्यामुळे राज्यपालांनी शिष्टमंडळाला भेटीची वेळ देऊन भेट दिली नाही हे वृत्त चुकीचे असल्याचे राजभवनाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यपालांनी शेतकऱ्यांची भेट न घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील कोश्यारींवर निशाणा साधला होता. महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल आम्ही पाहिला नाही. त्यांना अभिनेत्री कंगना राणावतला भेटायला वेळ आहे, पण माझ्या कष्टकरी अन्नदाता शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही, अशी टीका त्यांनी केली होती.
महत्वाच्या बातम्या : –
राज्यपालांकडे कंगनाला भेटायला वेळ आहे, पण शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही – शरद पवार
मुंबईतील मोर्चा शेतकऱ्यांचा नसून काही पक्ष ढोंगबाजी करत आहेत ;फडणवीसांचा आरोप
गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक
गायीची पूजा जशी केली जाते तशी शेतकऱ्याची पूजा करा, अबू आझमी यांचे वक्तव्य
मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट- रामदास आठवले