… म्हणून शेतकऱ्याने थेट पंतप्रधान मोदींच्या आईलाच लिहिले पत्र

0

गेली दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहे. सरकारने दीड वर्ष कायद्यांना स्थगिती देण्याचा प्रस्ताव देखील ठेवला होता, मात्र शेतकऱ्यांना हा प्रस्ताव फेटाळला होता.

अनेकदा चर्चा होऊन देखील कोणताही तोडगा निघालेला नाही. शेतकऱ्यांकडून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी परेड देखील काढली जाणार आहे. मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकार काही पावले मागे हटले असले तरी कायदे रद्द न करण्यावर मात्र ठाम आहे. अशाच एका शेतकऱ्याने हे कायदे मागे घेण्यात यावे, अशी मागणी करत थेट पंतप्रधान मोदींच्या आई हीराबेन यांना भावनिक पत्र लिहिले आहे.

पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील रहिवासी हरप्रीत सिंह यांनी हे पत्र पंतप्रधान मोदींच्या आई हिराबेन मोदींना लिहिले आहे. हिराबेन यांनी मोदींचे मन वळवावे, अशा आशयाचे हे पत्र आहे.

आम्ही कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहोत. आपल्या आईची विनंती कोणीही अमान्य करू शकत नाही. फक्त एक आईच आपल्या मुलाला आदेश देऊ शकते. आपण जर मोदींची मनधरणी केली, हे कायदे रद्द झाले, तर सर्व देश तुम्हाला धन्यवाद देईल, असे या पत्रात म्हटले आहे.

नरेंद्र मोदी यांचे मन वळविण्यासाठी आपल्या सर्व शक्तींचा उपयोग त्या एक आई म्हणून करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या : –

नवीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे – राजनाथ सिंह

‘प्रस्ताव मान्य असेल तरच आता पुढची बैठक होईल’

राज्यात ‘या’ तारखेला पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता

२४ तासांत नागपूरच्या तापमानात ५ अंशाची घसरण

लिंबू लागवडी विषयी माहिती

Leave a comment