… म्हणून आता आंदोलनातून शेतकरी निघून गेले आहेत – देवेंद्र फडणवीस

0

गेली दीड महिन्यापासून कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहे. सरकारसोबत अनेक चर्चा झाल्यानंतर देखील अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. भाजप नेत्यांकडून सातत्याने या आंदोलनातील लोक शेतकरीच नाहीत, असा दावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनातून मोठ्या प्रमाणात शेतकरी निघून गेले असल्याचा दावा केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला असे वाटते आहे की आता जर आपण दिल्लीचे आंदोलन बघितले. तर, डाव्या विचारसरणीचे लोक त्याचे नेतृत्व करत असल्याचे दिसत आहेत व अन्य काही वेगळ्या प्रकारचे देखील आहेत. सुरुवातीच्या काळात शेतकरी मोठ्या प्रमाणावर होते, परंतु आता शेतकरी देखील निघून गेले आहेत.

शेतकऱ्यांच्या देखील लक्षात आले आहे की , केंद्र सरकार सर्व मागण्या मान्य करत असताना, केवळ हे आंदोलन चाललंच पाहिजे, या हेतूने काही लोकं ते चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे फडणवीस म्हणाले.

केंद्र सरकार संपूर्ण चर्चा करत आहे. संवादातून प्रश्न सुटतात, त्यामुळे ते सुटतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या : –

बर्ड फ्लूसंदर्भात गैरसमज व अफवा पसरवू नका – उद्धव ठाकरे

पुण्यातून कोरोना लसीची पहिली खेप रवाना

देवेंद्र फडणवीस यांनी बर्ड फ्लू बाबत व्यक्त केली चिंता

पंतप्रधान किसान योजनेंतर्गत २० लाख अपात्र लाभार्थ्यांना 1,364 कोटी रुपये दिले: आरटीआय

आंध्र प्रदेशातील टोमॅटोच्या शेतकर्‍यांचे 2020 मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान

Leave a comment