खासदाराच्या उपस्थितीच शिवसैनिकाची पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यास मारहाण
नैसर्गिक संकटामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये हडपणाऱ्या विमा कंपन्या बाद कराव्यात आणि पिकविम्याची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी अशी मागणी यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांनी केली आहे. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे पिकविम्याचे साडेचार लाख रुपये हडपणाऱ्या ईफको टोकियो या कंपनीच्या कार्यालयासमोर गवळी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी घेराव घालून जवाब दो आंदोलन केले आहे.
मात्र या आंदोलनावेळी राडा झाल्याचे पाहण्यास मिळाले. गवळी यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे शिष्टमंडळ व्यवस्थापकांशी चर्चा करत असताना शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी व्यवस्थापकाला मारहाण करण्यास सुरुवात केली.
अनेक शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. सर्व शेतकऱ्यांना मदत त्वरित मदत मिळावी, या मागणीसाठी खासदार गवळी यांनी आंदोलन केले. आंदोलनानंतर चर्चा करताना संतप्त शिवसैनिकांनी व्यवस्थापकाला मारहाण करण्यास सुरु केली.
समाधानकारक उत्तर न दिल्याने संतापलेल्या संतोष ढवळे यांनी व्यवस्थापकाला खुर्चीतून ओढून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या अंगावर सोयाबीन देखील फेकले.