शरद पवार हे वरिष्ठ नेते आहेत, पण…

0

गेली दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला असला तरीही अद्याप कृषी कायद्यांबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकरी आणि विरोधी पक्ष केंद्र सरकारवर दबाव आणत आहे. महाराष्ट्रातून देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सातत्याने कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भात भूमिका मांडत आहे. आता यावरून केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, शरद पवार हे अनुभवी राजकीय नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री आहेत. त्यांना कृषी क्षेत्रातील समस्या आणि त्यावरील उपाययोजनांची चांगली जाण आहे. त्यांनी स्वतः कृषी सुधारणा घडवून आणण्यासाठी कठोर प्रयत्न केले आहेत.

ते या मुद्यावर अनुभव आणि विशेषज्ञतासह चर्चा करत आहे. त्यामुळे कृषी सुधारणेबाबतचे त्यांचे अज्ञानता आणि चूकीची सुचना देणारे ट्विट पाहून निराशाजनक वाटल्याचे देखील तोमर म्हणाले.

नवे कृषी कायदे शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्यासाठी अतिरिक्त माध्यम देत आहे. हे कायदे सध्यस्थितीतील किमान आधारभूत किंमत अर्थात MSP प्रणाली कुठलाही धोका पोहचवत नाहीत, असा दावा देखील तोमर यांनी केला आहे.

पवार हे वरिष्ठ नेते असून, मला वाटते त्यांच्यासमोर तथ्य चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले असावेत. त्यांना योग्य माहिती मिळाल्यानंतर ते शेतकऱ्यांना याच्या फायद्याबाबत नक्की सूचित करतील, असेही ते म्हणाले.

दरम्यान, याआधी शरद पवार ट्विट करत म्हणाले होते की, नवीन कृषी कायद्यांमुळे एमएसपीवर विपरित परिणाम होईल. बाजार समित्या कमकुवत होतील. नवीन कायद्यांमुळे एमएसपीवर शेतमाल खरेदी करण्याच्या यंत्रणेवर विपरित परिणाम होईल. यामुळे एमएसपी निश्चित करणं आणि ही व्यवस्था अधिक बळकट करण्यावर भर देण्याची गरज आहे.

महत्वाच्या बातम्या : –

सिंधू सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांची संजय राऊत घेणार भेट

कृषी कायद्यांना मंजुरी मिळत असताना शरद पवार कुठे होते?

लँटाना कॅमरा म्हणजे काय? त्याचा वापर काय जाणून घ्या

फॅमिली फार्मिंग म्हणजे काय? जाणून घ्या

महाराष्ट्रच्या विविध भागात हरभरा ३१०० ते ४७५० रुपये

Leave a comment