राज्य सरकारने गावांच्या विकासासाठी आणली शरद पवार ग्राम समृद्धी योजना

0

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनेतून शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे कामाच्या माध्यमातून सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधांची निर्मिती करून येणाऱ्या वीस वर्षांपर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत आणि त्या ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील घटक गावे समृद्ध करण्याचा उद्दिष्ट योजनेचा आहे.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक आणि सार्वजनिक कामे हाती घेऊन त्याद्वारे कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तसेच कामासाठी होणारे स्थलांतर हा महत्वाचा उद्देश असणार आहे.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेमध्ये ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ आणि ‘गाव समृद्ध तर महाराष्ट्र समृद्ध’ हे उद्दिष्ट ठेवून वैयक्तिक लाभाच्या चार योजना राबवण्यात येणार आहेत. यामध्ये अकुशल व कुशल प्रमाण संतुलित राहण्यासाठी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विविध योजना जसे की, शेततळे, वृक्ष लागवड, शोषखड्डे, फळबाग लागवड इत्यादी अकुशल खर्चाचे प्रमाण जास्त असलेल्या योजनांच्या संयोजनेतून प्रत्येक शेतकरी समृद्ध होईल, असा योजनेचा उद्देश आहे.

त्यासोबतच यामध्ये पशुपालनासाठी पक्का गोठा बांधणी, शेळीपालनासाठी शेडची निर्मिती करणे, कोंबडी पालनासाठी शेड बांधणे भू संजीवनीसाठी नाडेप कंपोस्टिंग इत्यादी वैयक्तिक कामाच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यात येणार आहे.

कमी शेळ्या असतील तर शेतमजुराला त्याचा फायदा होत नाही. ही बाब लक्षात घेता किमान दोन शेळ्या असलेल्या भूमीहीन मजुरांना व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकेल. एका शेडसाठी ४९ हजार २८४ रुपयांचा खर्च येतो.

शेळ्या-मेंढ्या करता चांगल्या प्रतीची शेड बांधून दिल्यास या जनावरांचे आरोग्य उत्तम राहणार असून वाया जाणारे मल, मूत्र शक्तीमध्ये उत्कृष्ट सेंद्रिय खत म्हणून वापरली जाऊ शकते. या योजनेप्रमाणे दहा शेळ्यांचा गट शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे ग्राह्य धरला जातो. योजनेच्या आधारे एका कुटुंबात जास्तीत जास्त ३० शेळ्यांकरिता तीन पट अनुदान मंजूर करण्यात येईल.

भू संजीवनी नाडेप कंपोस्टिंग

शेतीमध्ये असलेल्या कचऱ्यावर कंपोस्टिंगद्वारे प्रक्रिया करून जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होऊन कृषी उत्पादनात भर पडते. या योजनेअंतर्गत कंपोस्टिंग करता शेतात एक नाडे बांधण्यासाठी योजना आहे. या नाडेप  मध्ये सेंद्रिय पदार्थ, कचरा, शेण आणि माती यांचे एकावर एक थर रचले जातात. दोन ते तीन महिन्यात काळपट तपकिरी मऊ, दुर्गंधी विरहित कंपोस्ट तयार होते. या योजनेच्या माध्यमातून नाडेपच्या  बांधकामासाठी १० हजार ५३७ रुपये खर्च अपेक्षित आहे.

 कुकुटपालन शेड बांधणे

कुक्कुटपालन मुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना पूरक उत्पादन मिळण्याबरोबरच प्रथिनेयुक्त पोषक अन्नघटकांचा पुरवठा होतो. परंतु कोंबड्यांसाठी चांगली शेड नसल्याने त्यांच्या आरोग्य नेहमीच खालावलेले असते. तर चांगल्या प्रतीचे शेड मिळाले तर रात्रीच्या वेळी त्यांचे, पिल्लांच्या आणि अंड्यांचे प्राण्यांपासून संरक्षण होते. प्रत्येक शेडसाठी ४९ हजार ७६० रुपये खर्च अपेक्षित आहे.  शंभर पक्षी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या लाभार्थींनी पक्ष्यांची संख्या १५० च्या वर नेल्यास मोठ्या शेडसाठी तीनपट निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या : –

महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी कोरोनाची लागण

जाणून घ्या जास्त कांदा खाण्याचे दुष्परिणाम

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे नाही आले तर करा ‘या’ मोबाईल क्रमांकावर तक्रार

Leave a comment