महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेची सातवी यादी जाहीर
महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजनेची सातवी यादी जाहीर झाली आहे 1 जानेवारी २०१९ रोजी ही यादी प्रकाशित करण्यात आली होती पण त्यामध्ये काही गावांची नावे नसल्यामुळे ही यादी प्रकाशित करण्यात आली नव्हती परंतु आता ही यादी पूर्ण गावासहीत प्रकाशित करण्यात आली आहे
शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपले आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे आपण जवळच्या आपले सरकार केंद्र किंवा CSC सेंटर वर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे जर आपले यादीमध्ये नाव असेल तर आपण आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक जवळच्या CSC केंद्रावर किंवा आपले सरकार केंद्रावर जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करावे आणि त्याची पावती घ्यावी.
या यादीमध्ये नाव नसल्यास नाराज होण्याचे कारण नाही कारण आणखी पुढच्या यादीमध्ये आपले नाव येऊ शकते तशी विचारणा आपण बँकेत जाऊन करू शकता जर आपले कर्ज कर्जमुक्तीच्या लाभास पात्र असल्यास आपले नाव पुढच्या यादीमध्ये नक्की येऊ शकते.
जाणून घ्या कश्या प्रकारे तुम्ही डाऊनलोड करू शकता यादी
– प्रथम CSC पोर्टल वर लॉगइन करा
– डाव्याबाजूला वरती सर्च वर दाबून त्यामध्ये mahatma jotirao phule karj mukti yojana in goverment यावर क्लिक करा
– त्यानंतर तुम्ही महात्मा जोतीबा फुले कर्जमुक्ती योजना या पेज वर जाणार
– त्या पेजवर आल्या नंतर तिथे डाव्या बाजूला Adhar Authentication List Download असे नाव दिसेल त्यावर क्लिक करा.
-त्यानंतर तिथे तुम्हाला VKList_7_2021-01-01 ह्या पद्धतीने यादी दिसेल.
–VKList_7_2021-01-01 ह्या वर क्लिक केल्यानंतर आपण ज्या जिल्ह्याचे लॉगइन केले आहे त्याच्या उजव्या बाजूला तुम्हाला त्या जिल्ह्याची यादी पाहायला मिळेल. ती यादी PDF स्वरुपात ओपन होईल त्यानंतर तुमचे गाव त्यामध्ये शोधा त्याला त्यावर दाबा दाबल्या नंतर तुम्हाला वरती हिरवा बाण दिसेल त्यावर क्लिक करा लगेच तुमची लिस्ट ओपन होईल आणि आपण त्यामध्ये आपले नाव पाहू शकता.