उन्हाळी भुईमूग उत्पादन वाढीचे सप्तसुत्रे

0

लागवड कालावधी

काही शेतकरी डिसेंबर मध्येच लागवड चालू करतात पण त्यामध्ये उत्पादन घटच होते पण योग्य वेळ थंडीचा प्रमाण कमी होताच 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या काळात थंडी कमी असल्याने उगवण चांगली होत असल्यामुळे या कालावधीत उन्हाळी हंगामात भरपूर सूर्यप्रकाश व कोरडे हवामान असल्याने भुईमूग पिकाची वाढ चांगली होते त्यामुळे उत्पादन 30-40% वाढ होते तसेच रोग किडींचा प्रादुर्भाव नगण्य असतो व त्यामुळे खरीपापेक्षा उन्हाळी हंगामात दुपटीने उत्पादन जास्त मिळते.

 सुधारित वाण

1) SB – 11

– मराठवाड्यात सध्या सगळ्यात जास्त शेतकरी बांधवांचे पसंती असलेले वाण पण कमी उत्पादन
– खरीप व रब्बी हंगाम शिफारस
– तेलाचे प्रमाण जास्त पण प्रती एकर उत्पादन कमी होते

2) TAG 24 व 26

– उन्हाळी हंगामासाठी शिफारस
– तेलाचे प्रमाण 49-50%
– प्रती एकर 45-50 किलो बियाणे शिफारस
– प्रती एकरी 22-25 क्विंटल उत्पादन

3) फुले उन्नती ,JL 501 आणि TPG 41

– उपट्या भुईमूग प्रकारातील वाण
– टपोऱ्या दाण्याचे
– तेलाचे प्रमाण 49-51%
– अधिक उत्पादन देणारे प्रती एकरी 25-30 qt

4) 2) TAG 51 व वरदान

– उन्हाळी हंगामासाठी शिफारस
– तेलाचे प्रमाण 51-53%
– प्रती एकर 45-50 किलो बियाणे शिफारस
– प्रती एकरी 25-28 क्विंटल उत्पादन
– सगळ्यात जास्त फायदेशीर
– शेंगांचे दुप्पट उत्पादन आणि भरपूर चारा होतो

बीजप्रक्रिया

रासायनिक

रोपावस्थेत उद्‌भवणाऱ्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी बियाण्यास 3 ग्रॅम थायरम किंवा 2 ग्रॅम कार्बेन्डाझीम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी किंवा

जैविक

जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा या बुरशीजन्य घटकाची 5 ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी, तसेच प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम व
पीएसबी या जीवाणूसंवर्धकाची प्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवून मगच पेरणीसाठी वापरावे.
रुंद सरी वरंबा पद्धत लागवड(इक्री सट)

– गादी वाफ्यावर जमीन भुसभुशीत राहत असल्याने मुळांची कार्यक्षमता वाढून पिकाची वाढ जोमदार होते. उत्पादनात किमान 50% ने वाढ होते
– जमिनीत पाणी व हवा यांचे प्रमाण संतुलिता ठेवता येते.
– पिकाची कार्यक्षमता वाढते.
-पिकास पाण्याचा ताण बसत नाही. जास्त पाणी झाल्यास सरीतून पाण्याचा निचरा करता येतो.
– तुषार सिंचन पद्धतीने पाणी देता येते.
– या पद्धतीत पाटाने पाणी देता येते यासाठी वेगळी रान बांधणी करावी लागत नाही.
– संतुलित खत व्यवस्थापन केल्याने अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे दिसत नाहीत.
– योग्य प्रकारे पिकाची वाढ होऊन उत्पादनात वाढ होते.

गादीवाफे तयार करण्याची पद्धत

-पूर्व मशागत केलेल्या जमिनीत सरी या यंत्राने गादी वाफे (रुंद सरीवाफे) तयार करावेत.
-अशा वाफ्याची जमिनी लगत रुंदी 150 सें.मी. तर वरची रुंदी 120 सें.मी. ठेवावी. वाफ्याची जमिनीपासून उंची 10 ते 15 सें.मी. ठेवावी. किंवा 1.50 मीटर अंतरावर 30 सें.मी.च्या नांगराने सऱ्या पाडाव्यात.
-या पद्धतीत 1.20 मीटर रुंदीचे आणि 15 सें.मी. उंचीचे वाफे तयार होतील अशा प्रकारे तयार केलेल्या वाफ्याची लांबी जमिनीच्या उतारानुसार 40 ते 50 मीटर ठेवावी.
-हलक्‍या जमिनीत मधल्या दोन सऱ्यांपर्यंत पाणी पोचत नाही.
अशा वेळेस 90 सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून गादी वाफे तयार करावेत.
-अशा वाफ्यावर 30x 10 सें.मी.अंतरावर भुईमुगाची झिगझॅग पद्धतीने पाईपाने छिद्र करून प्रत्येक छिद्रामध्ये भुईमुगाचे दोन बी टाकून टोकण पद्धतीने जानेवारी महिन्यात लागवड करावी.

संतुलित खत व्यवस्थापन

– पेरणीच्या वेळी खतची मात्रा प्रती एकरी 10 किलो नत्र ( अमोनिअम सल्फेट 50 किलो) व 20 किलो स्फुरद (सिंगल सुपर फॉस्फेट 125 किलो) प्रमाणत बेड वर पेरणी पूर्व किंवा टोकण करण्यापूर्वी पेरून द्यावे सूक्ष्म मूलद्रव्य च वापर

– कॅल्शियम व सल्फर(जिप्सम)

-भुईमूग पिकाची आरया लवकर जाणे,तसेच उत्तम पोषण होणे,दाण्याचे वजन वाढणे,तेलाचे प्रमाण वाढ होऊन उत्पादनात वाढ होण्यासाठी किमान

-प्रती एकरी 3 बॅग जिप्सम वापर पेरणी क्या वेळेस तसेच पेरणी नंतर 30-35 दिवसांनी 3 बॅग पेरून दिल्यास कॅल्शियम आणि सल्फर ची कमतरता पूर्ण होऊन तसेच जमीन भुसभुशीत होऊन उत्पादनात 30-40% निश्चितच वाढ होते

-प्रती एकरी पेरणी करताना 10 किलो झिंक सल्फेट व 10 फेरस सल्फेट आणि बोरॉन चां निश्चितच वापर करावाठिबक व तुषार सिंचन व्यवस्थापन

– जातीनूसार भुईमुगाचा कालावधी साधारणत: 90 ते 115 दिवसांचा असू शकतो.

-उन्हाळी भुईमुगाच्या ओलीत व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर फायद्याचा राहतो.

-पेरणीपूर्वी ओलीत देऊन जमीन भिजवून घ्यावी. वाफसा आल्यावर अथवा जमिनीचा वरचा पापुद्रा सुकल्यावर लगेच पेरणी करावी. पेरणीनंतर 4-5 दिवसांनी पाणी द्यावे किंवा उगवण झाल्यानंतर लगेचच ओलीत करावे.

-यानंतर पीक फुलोरा अवस्थेत येईपर्यंत पाण्याचा ताण द्यावा. यादरम्यान जमिनीला भेगा पडलेल्या नाहीत, याची खात्री करावी.

– फुले येण्याच्या अवस्थेपासून (पेरणीपासून 22-30 दिवस ) ठराविक अंतरानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

– आऱ्या सुटण्याची अवस्था (पेरणीपासून 40-45 दिवस)

– शेंगा पोसण्याची अवस्था (पेरणीपासून 65 – 70 दिवस) या वेळी पाण्याची पाळी चुकवू नये

कीड व रोग नियंत्रण व्यवस्थापन :

– मावा, फूलकिडे, तुडतुडे- प्रादुर्भाव दिसताच 5 निंबोळी अर्काची फवारणी.

– दुसरी फवारणी 15 दिवसांनंतर- डायमिथोएट- 500 ml प्रति 500 लिटर पाण्यातून फवारणी

पाने खाणारी व पाने गुंडाळणारी अळी- क्विनॉलफॉस (25%EC) 20 ml प्रति 10 lit पाण्यातून फवारणी. गरजेनुसार शिफारसीत कीटकनाशकांच्या पुढील फवारण्या कराव्यात.

टिक्का रोग नियंत्रण – मॅन्कोझेब 1 gm किंवा कार्बेन्डाझिम 1 gm किंवा संयुक्त बुरशीनाशक 2 gm किंवा टेब्युकोनॅझोल सल्फर 1 ml प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

– तांबेरा रोग नियंत्रण- हेक्साकोनॅझोल १ मिली प्रति लिटर पाणी प्रति या प्रमाणे फवारणी करावी.

काढणी :

भुईमुगाचा पाला पिवळा दिसू लागल्यावर आणि शेंगाचे टरफल टणक बनून आतल्या बाजूने काळसर दिसू लागताच काढणी करावी. काढणीनंतर शेंगा चांगल्या वाळवाव्यात. त्यातील ओलाव्याचे प्रमाण 8-9% टक्‍क्‍यांपर्यंत खाली आणावे.

उत्पादन :

या रुंद सरी वरंबा व ठिबक सिंचन सुधारित पद्धतीने भुईमुगाची टोकण पद्तीने लागवड, संतुलित खतांचा वापर, आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन व पीक संरक्षण केल्यास
भुईमुगाच्या सुधारित वाणांपासून प्रती एकरी 22-25 क्विंटल वाळलेल्या शेंगा तसेच 2-3 टन कोरडा पाला मिळण्यास काहीच हरकत नाही.

जितेंद्र दुर्गे                                                                                                                     ९४०३३०६०६७

Leave a comment