सिंधू सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांची संजय राऊत घेणार भेट

0

गेली जवळपास 70 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहे. अनेकदा चर्चा होऊन देखील अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. कृषी कायदे मागे घेण्याच्या मुद्यावर शेतकरी आक्रमक झाले आहे. एकीकडे देशव्यापी चक्का जामची शेतकऱ्यांनी घोषणा केली आहेत, सोबतच सरकारसोबत देखील चर्चेसाठी तयारी दर्शवली आहे.

आता शिवसेना खासदार संजय राऊत सिंधू बॉर्डरवर दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. याबाबत राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली होती. आता संजय राऊत यांनी आणखी एक ट्विट करत ते दुपारी 1 वाजता गाझीपूर येथील शेतकरी आंदोलकांना भेट देणार असल्याचे सांगितले आहे.

कृषी कायद्याच्या विरोधात मुंबईत देखील आंदोलन झाले होते. या आंदोलनाला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला होता. आता संजय राऊत स्वतः शेतकरी आंदोलनाचे केंद्र असलेल्या सिंधू बॉर्डरवरील शेतकऱ्यांना भेटून आपला पाठिंबा देणार आहेत.

राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली की, महाविकास आघाडीने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या संकट काळात त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. शेतकऱ्यांची तडफड आणि अश्रू अस्वस्थ करणारे आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरुन आज गाझीपूर सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना भेटत आहे.

महत्वाच्या बातम्या : –

कृषी कायद्यांना मंजुरी मिळत असताना शरद पवार कुठे होते?

लँटाना कॅमरा म्हणजे काय? त्याचा वापर काय जाणून घ्या

फॅमिली फार्मिंग म्हणजे काय? जाणून घ्या

महाराष्ट्रच्या विविध भागात हरभरा ३१०० ते ४७५० रुपये

गांडूळ अर्क वापरण्याची पद्धत व फायदे

Leave a comment