शेतकरी आंदोलनावर सायना नेहवाल आणि अक्षय कुमारचे ‘कॉपी-पेस्ट’ ट्विट
कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेली अनेक महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. देशभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत असतानाच आता आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील या आंदोलनाची दखल घेतली जाऊ लागली आहे. प्रसिद्ध पॉप स्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाविषयी केलेल्या एका ट्विटने भारतात देखील आता गदारोळ पाहण्यास मिळाला.
रिहानाच्या ट्विटने आता आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतातील शेतकरी आंदोलनाची चर्चा होऊ लागली. मात्र दुसरीकडे भारतातील अनेक सेलिब्रेटी, क्रिकेटपटूंनी हा आमच्या देशातील अंतर्गत मुद्दा असल्याचे ट्विट करत सरकारच्या बाजूने मत मांडण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले.
#IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda हे हॅशटॅग वापरत सरकारच्या बाजूने ट्विट करणाऱ्या सेलिब्रेटींची रांगच लागली. यात प्रामुख्याने अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगन, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि सायना नेहवालने देखील ट्विट केले.
Farmers constitute an extremely important part of our country. And the efforts being undertaken to resolve their issues are evident. Let’s support an amicable resolution, rather than paying attention to anyone creating differences. 🙏🏻#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda https://t.co/LgAn6tIwWp
— Akshay Kumar (@akshaykumar) February 3, 2021
या सर्वांमध्ये सर्वात जास्त चर्चा अक्षय कुमार आणि सायना नेहवालच्या ट्विटची होत आहे त्याचे कारण देखील तसेच आहे.अक्षयच्या ट्विटनंतर अगदी तसेच कॉपी-पेस्ट ट्विट सायना नेहवालने केले आहे. अगदी ट्विटमधील हॅशटॅग देखील समान असल्याने सोशल मीडियावर दोघेजण आता चांगलेच ट्रोल होत असल्याचे दिसून येत आहे.
अक्षय कुमारने ट्विट करत लिहिले की, शेतकरी हा आपल्या देशाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मतभेद निर्माण करणाऱ्यांकडे लक्ष देण्याऐवजी, सामंजस्य ठरावाचे समर्थन करा.
Farmers constitute an extremely important part of our country. And the efforts being undertaken to resolve their issues are evident. Let’s support an amicable resolution, rather than paying attention to anyone creating differences. 🙏🏻#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda pic.twitter.com/FhclAMLiik
— Saaina Nehwal (@NSaina) February 3, 2021
दरम्यान, सरकारच्या समर्थनार्थ ट्विट करण्याची अक्षय कुमारची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील अक्षय कुमारला मोदी सरकारच्या समर्थनार्थ ट्विट करताना पाहिले गेले आहे. तर दुसरीकडे सायना नेहवालची कॉपी पेस्ट ट्विटची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील अनेकदा कॉपी पेस्ट ट्विटमुळे सायना नेहवाल ट्रोल झाली आहे.
महत्वाच्या बातम्या : –
गुड़मार म्हणजे काय? त्याची लागवड कशी करावी जाणून घ्या
स्टीव्हिया लागवड शेतकर्यांसाठी एक फायदेशीर व्यवसाय
“शेतकऱ्यांनो, आपल्या गायी – म्हशींचे फोटो पाठवा आणि कमवा 2000 रुपये”
गोबरधन योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी गोबरधनचे एकात्मिक पोर्टल केले सुरू
मार्बलचा व्यवसाय सोडून लिंबाची शेती करीत ‘हा’ शेतकरी कमावतोय 8 लाख रुपये