दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; गायीच्या दूधदरात दोन रुपयांची वाढ

0

राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जात असलेल्या गायीच्या दूध दरात आता २ रुपयांनी वाढ झाली आहे. डेअरीचालकांनी प्रतिलिटरल सरासरी दोन रुपयांची वाढ केली आहे. कोरोनामुळे दुधाच्या दरात घसरण होत असल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले होते. पण सध्याच्या दरवाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सोनई डेअरीने शेतकऱ्यांना एक जानेवारी २०२१ पासून गायीच्या दुधाला २४ रुपयांऐवजी प्रतिलिटर २६ रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे. यासह वाहतूक व कमिशनसहीत हा दर २७.५० रुपये इतका राहील असे सोनईचे अध्यक्ष दशरथ माने यांनी सांगितले.

कोरोनच्या काळात मध्यतंरी राज्यातील डेअरी उद्योगांनी टँकरमधून येणाऱ्या दुधाचे दर कमी केले होते. त्यामुळे खासगी संकलक देखील गावपातळीवर शेतकऱ्यांना कमी दर देत दुधाची खरेदी करत होते. गेल्या महिन्यात २४ -२५ रुपये दराने टँकरमधील दूध खरेदी केले जात होते परंतु ते आता २८ रुपयांपर्यंत आणले गेले आहे. एक जानेवारीपासून पावडर प्लांटचालक हाच दर काही ठिकाणी २९ रुपये देणार आहेत. यामुळे ही पोषक स्थिती शेतकऱ्यांच्याही पथ्यावर पडणारी आहे, असे म्हस्के यांनी सांगितले आहे.

देशांतर्गत बाजारात लोण्याचे आणि दूध भुकटीचे दर वाढल्यामुळे दुधाची खरेदी करण्यासाठी अतिशय पुरक स्थिती डेअरी उद्योगात तयार झाली आहे. एसएमपीचे दर आता प्रतिकिलो १६० रुपयांवरुन २०० रुपयांच्या पुढे आणि लोण्याचे दर देखील देशांतर्गत बाजारात २३० रुपयांवरुन २९० रुपयांपर्यत झालेले आहेत.यामुळे डेअरी उद्योगांमधील पावडरचे साठे निकाली निघण्यास मदत होते आहे. त्यातून शेतकऱ्यांच्या दुधाला देखील दरवाढ मिळण्यात हातभार लागत आहे.

महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी सांगितले की, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने शेतकऱ्यांना बदलत्या बाजारपेठेचा लाभ तातडीने देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने दर वाढविलेले नसले तरी कात्रज ने पुढाकार घेत गायीच्या दुधाला प्रतिलिटर एक रुपया तर म्हैशीच्या दुधाला खरेदीकार दोन रुपयांनी वाढविले आहेत.

महत्वाच्या बातम्या : –

महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी कोरोनाची लागण

जाणून घ्या जास्त कांदा खाण्याचे दुष्परिणाम

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे नाही आले तर करा ‘या’ मोबाईल क्रमांकावर तक्रार

राज्य सरकारने गावांच्या विकासासाठी आणली शरद पवार ग्राम समृद्धी योजना

कुक्कुटपालन विकास महामंडळाच्या पार्लरमध्ये कडकनाथ २४ तास उपलब्ध

Leave a comment