यवतमाळच्या बाजारावरील निर्बंध आणखी आठ दिवस कायम

0

यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून बाजारपेठेवर निर्बंध लावले गेले होते. रविवारी म्हणजेच २८ फेब्रुवारी २०२१ रोजी संपूर्ण संचारबंदी पाळल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेश काढून बाजारावरील निर्बंध आणखी आठ दिवस कायम केले असल्याची माहित समोर आली आहे.

आदेशानुसार आता यवतमाळ जिल्ह्यातील दुकानांच्या वेळा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच राहणार अशी माहिती देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवारपर्यंत हे निर्बंध राहतील. त्यानंतर शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवार सकाळी ९ वाजतापर्यंत जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी असणार आहे.

मात्र यवतमाळ शहरातील व्यापाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दुकानांच्या वेळा सायंकाळी ५ ऐवजी किमान ७ वाजतापर्यत वाढविण्याची व्यापाऱ्यांची मागणी आहे. प्रामुख्याने शहरातील नोकरदार वर्ग हाच मोठा ग्राहक आहे. या मंडळींची कार्यालये सुरू राहणार आहे. त्यामुळे ५ वाजताच्यानंतरच त्यांना खरेदीसाठी वेळ राहणार आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने दुकानांच्या वेळा ७ वाजतापर्यंत वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.

निर्बंध घातल्यानंतरही कोरोना रुग्ण वाढीला ब्रेक लागल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे या निर्बंधांना मुदतवाढ देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. दरम्यान गेल्या आठवडाभरापासून यवतमाळसह सोळाही तालुका पातळीवर नागरिक स्वयंस्फूर्तपणे निर्बंधांचे पालन करताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या : –

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भाज्यचे दर स्थिर

शेतकऱ्याने उजाड माळरानावर फुलवली द्राक्षांची बाग

नरखेड परिसरात शेतकऱ्यांच्या आनंदाला उधाण; उजनीचे पाणी भोगावती नदीत आले

लाल कांदा हृदयविकाराचा झटका आणि कर्करोगासारख्या आजारांपासून बचाव करतो, त्याचे फायदे जाणून घ्या

मुर्रा म्हशीची ओळख कशी करता येणार, दुग्ध उत्पादन क्षमता व किंमत काय याची संपूर्ण माहिती

 

Leave a comment