शेतकरी आंदोलन मोडित काढण्याचा प्रयत्न, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्याविरोधात काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर परेडमध्ये हिंसाचार झाल्याने शेतकरी आंदोलनाला वेगळे वळण मिळाले आहे. या हिंसाचारानंतर दोन शेतकरी संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली असली तरीही शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
याच पार्श्वभूमीवर बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हे आंदोलन मोडित काढण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.
संसदेच्या प्रथा, परंपरा कायदे धाब्यावर बसूनच कारभार रेटण्याचे काम सुरू आहे. आंदोलन दडपण्याचा, मोडित काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप देखील राजू शेट्टी यांनी केला. ते साम टिव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.
लाल किल्यावर झेंडा फडकवल्याने चर्चेत आलेला अभिनेता दीप सिद्धूबाबत देखील राजू शेट्टींनी भाष्य केले. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर त्याचा फोटो कसा ? मी खासदार असताना केवळ एकदा मोदींसोबत फोटो काढण्याची संधी मिळाली. मग हा साधा व्यक्ती कसा तिथे पोहचलो व तोच आंदोलक कसा ? असे प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केले.
सरकारने खरेदीच्या भानगडीत पडू नये. एक कायदा असावा करावा ज्यात सरकारने हमीभाव निश्चित केल्यानंतर कोणाला त्यापेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येऊ नये, अशी मागणी देखील राजू शेट्टींनी केली.
महत्वाच्या बातम्या : –
अण्णांची मनधरणी करण्यास फडणवीसांना यश, उपोषणातून माघार
कृषी कायद्याविरोधात विरोधी पक्षांची एकजूट, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकणार
शेतकरी आंदोलनाबाबत राहुल गांधींनी मांडली भूमिका
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अण्णा हजारे करणार उपोषण