‘पवारांच्या पायाजवळ बसण्यासाठीच राजू शेट्टींचा कृषी कायद्यांना विरोध’

0

दिल्लीच्या सीमेवर गेली एक महिन्यापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनला महाराष्ट्रातून देखील पाठिंबा मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील कृषी कायद्याचा विरोध करत शेतकरी आंदोलनाला समर्थन दिले आहे. याच पार्श्वभूमीवर ‘शरद पवारांच्या पायाजवळ बसण्यासाठी राजू शेट्टींचा कृषी कायद्यांना विरोध करत’ असल्याची घणाघाती टीका राज्याचे माजी कृषीमंत्री आणि भाजप नेते अनिल बोंडे यांनी केली.

केवळ शरद पवार यांच्या पायाशी बसण्यासाठी राजू शेट्टी हे कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. त्यांना आता केवळ विधानपरिषदेची आमदारकी दिसत असल्याची टीका अनिल बोंडे यांनी केली आहे.

परभणीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना बोंडे म्हणाले की, राजू शेट्टी हे कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. जेणेकरुन आपल्याला महाविकासआघाडीत कुठेतरी स्थान मिळेल. यासाठीच राजू शेट्टींकडून लाळघोटेपणा सुरु आहे.

यावेळी बोलताना बोंडे यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर देखील निशाण साधत त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना अवकाळाची पैसे मिळाले नसल्याचे म्हटले आहे. आपलं ठेवायंच झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, अशी बच्चू कडू यांची अवस्था असल्याची टीका त्यांनी केली.

Leave a comment