‘या’ दिवशी विदर्भात पावसाचा इशारा, विजांसह पावसाची शक्यता

0

येत्या गुरुवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर १७ मार्चला काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी तर १८ तारखेला जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नागपूरसह वर्धा, गोंदिया, अमरावती आणि अकोला जिल्ह्यात १७ मार्चला तुरळक पाऊस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र दुसऱ्या दिवशी सर्वच जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे असे असताना आता पुन्हा शेतकऱ्यांंना पावसाचा सामना करावा लागणार आहे.

मात्र दुसरीकडे, चंद्रपूरचे तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी येथील तापमान ३९.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यात ०.४ अंशाची भर पडली.

दरम्यान, रविवारी नागपूरसह सर्वच जिल्ह्यातील किमान तापमानामध्ये घट झाल्याचे पहायला मिळाले. वर्धा आणि बुलडाणामध्ये ३४.४ व ३३.१ अंश सेल्सिअस नोंद झाली. नागपुरातील तापमान ३.५ अंशाने घटल्याने ३३.७ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली.गोंदियात ३६ तर अकोला व गडचिरोलीमध्ये ३६.१ आणि ३६.४ अंश सेल्सिअस तापामानाची नोंद झाली आहे. अमरावतीमध्ये ३३.८ अंश सेल्सिअस तापमान होते. यवतमाळात ३५.७ तर वाशिममध्ये ३७ अंश तापमान नोंदविले गेले.

महत्वाच्या बातम्या : –

लखनऊमध्ये उघडले हर्बल संग्रहालय

मेरा रेशन अ‍ॅपद्वारे आता घरी बसून तुम्हाला किती रेशन मिळेल हे ‘अश्या’ प्रकारे तपासा

जाणून घ्या का आहेत काकडीची साले आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर

मोठी बातमी! शेतीच्या यंत्रांवर मिळत आहे ४० ते ५० टक्के सूट, वाचा संपूर्ण माहिती

माती परीक्षणाचा नेमका उद्देश काय ? वाचा सविस्तर

 

Leave a comment