शेतकरी आंदोलनाबाबत राहुल गांधींनी मांडली भूमिका

0

आता एक बाजू निवडण्याची वेळ आली आहे. माझा निर्यण स्पष्ट आहे. मी लोकशाहीसोबत आहे. मी शेतकरी आंणि त्यांच्या शांततामय मार्गाने चाललेल्या आंदोलनासोबत आहे, अशा शब्दात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलानाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान आंदोलनाला हिंसाचाराचे गालबोट लागले होते. यानंतर शेतकऱ्यांविरोधात देखील स्थानिक लोक रस्त्यावर उतरले आहेत.

शेतकरी आंणि त्यांच्या शांततामय मार्गाने चाललेल्या आंदोलनासोबत असल्याचे म्हणत राहुल गांधींनी शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. याआधी ट्विट करत त्यांनी अर्थव्यवस्थेवरून देखील मोदी सरकारवर निशाणा साधला.

मोदी यांचा कारभार हा जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था कशी नष्ट करावीत याचा एक धडा आहे, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या : –

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अण्णा हजारे करणार उपोषण

कृषी कायदे मागे घेतले नाहीत तर मी आत्महत्या करेन – राकेश टिकैत

प्रचलित पेरणी पध्दतीने लागवड करतांना सोयाबिन पिकाच्या मुख्य समस्या 

बंद केलेली मका खरेदी सुरू, ३१ जानेवारीपर्यंत सुरु राहणार खरेदी

असे बनवावे घरच्या घरीच प्रभावी किड व बुरशी नाशक…

 

Leave a comment