मार्केटिंग फेडरेशनच्या ६१ धान खरेदी केंद्रावरुन ३५ कोटी ३७ लाख रुपयांची धान खरेदी

0

दिवाळीनंतर धान खरेदी केंद्रावरील धानाची आवक वाढली आहे. गेल्या काही दिवसांच्या कालावधीत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या ६१ धान खरेदी केंद्रावरुन ३५ कोटी ३७ लाख रुपयांची धान खरेदी करण्यात आली आहे अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र पूर्ण धान खरेदी केंद्र सुरु न  झाल्याने काही भागातील शेतकऱ्यांची समस्या हि अद्यापही कायम आहे.

शासनाने यंदा धानाला प्रती क्विंटल १८६८ ते १८८८ रुपये हमीभाव आणि ७०० रुपये प्रती क्विंटल दर जाहीर केला आहे. तर बाहेर ऐवढा दर मिळत नसल्याने शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. सध्या हलक्या धानाची कापणी आणि मळणी पूर्ण झाली असल्याने याच धानाची विक्री सुरु आहे. मात्र आता जड धानाच्या कापणीाला सुध्दा सुरुवात झाली असून हा धान देखील पंधरा दिवसात बाजारपेठेत विक्रीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे धान खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढण्याची शक्यता आहे.

मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत १ लाख ३५ हजार क्विंटल धान खरेदी केली असून खरेदी केलेल्या धानाची किमत ३५ कोटी ३७ लाख रुपये आहे. धान खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांची गर्दी कमी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची दूरवर पायपीट कमी करण्यासाठी यंदा धान खरेदी केंद्राची संख्या वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जळपास ३० ते ३५ धान खरेदी केंद्र वाढण्याची शक्यता असून यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीची मंजुरी मिळताच हे धान खरेदी केंद्र सुरु केले जाणार असल्याची माहिती आहे.

Leave a comment