परभणीमध्ये १३ लाख ७३ हजार ६२ क्विंटल कापूस खरेदी

0

परभणीमध्ये भारतीय कापूस महामंडच्या ७ केंद्रांवर आणि राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या ५ केंद्रांवर आतापर्यंत ५१ हजार ७४ शेतकऱ्यांचा १३ लाख ७३ हजार ६२ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.

पणन महासंघाच्या केंद्रावर कापूस विक्रीसाठी पाच बाजार समित्यांअंर्गत ५४ हजार ५७३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. सीसीआय अंतर्गत ताडकळस बाजार समितीत १ हजार ९५२ शेतकऱ्यांनी नोंदणी केले आहे.

भारतीय कापूस महामंडळातर्फे जिल्ह्यातील जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, सोनपेठ, पू्र्णा, ताडकळस, या ७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांर्तगत आणि राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे परभणी, पाथरी, गंगाखेड, सोनपेठ, पालम या ५ बाजार समित्यांतर्गंत कापूस खरेदी सुरु आहे.

खुल्या बाजारातील दरात अद्याप सुधारणा झालेली नाही. त्यामुळे चांगल्या दरासाठी शेतकऱ्यांना शासकीय खरेदी केंद्राचा पर्याय आहे. परंतु अनेक जिनिंग कारखान्यांमध्ये रुईच्या गाठी, सरकी तयार करण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे खरेदी केलेला कापूस साठविण्यासाठी जागा अपुरी पडत आहे.

गेल्या आठवड्यात बोरी आणि सोनपेठ बाजार समित्याअंतर्गंत नोंदणी करण्यात आली. आतापर्यंत सीसीआयच्या ७ केंद्रांवर ४० हजार १६२ शेतकऱ्यांचा १० लाख ३१ हजार ५९ क्विंटल आणि महासंघाच्या ५ केंद्रांवर १० हजार ९१२ शेतकऱ्यांचा ३ लाख ४२ हजार ३ क्विंटल कापूस खरेदी झाला.

महत्वाच्या बातम्या : –

पुढील दोन ते तीन दिवस थंडीची लाट कायम राहणार

कांदा पिकावरील विविध रोगांची लक्षणे रोगास प्रतिकूल उपाय या संबंधीची माहिती

जाणून घ्या कश्याप्रकारे योग्य खते निवडावी

चारा खातांना गाईच्या पोटात प्लास्टिक गेलं तर ते काढण्यासाठी करा ‘हा’ उपाय

‘शेतकरी विरोधी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरुच राहणार’

Leave a comment