पुणे ठरले सर्वात थंड शहर, पुढील दोन – तीन दिवस तापमानातील घट कायम राहणार

0

उत्तरेकडून येणाऱ्या गर वाऱ्याचा जाेर वाढल्याने महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानाचा पारा घसरला असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पहायला मिळत आहे. देशातील हवामानातील बदलाचा परिणाम हा सर्व्यात आधी  पुण्यात दिसून येतो.

राज्यातील सर्वांत कमी किमान तापमान पुणे येथे १०.३ अंश सेल्सिअस गेल्या २४ तासात नोंदविले गेले. पुढील दोन ते तीन दिवस तापमानातील ही घट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुण्यातच रात्रीचे तापमान कमी होण्यामागचे नेमके कारण काय, या विषयी ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, पुण्याचे किमान तापमान कमी राहण्याचे प्रमुख कारण म्हणजे पुण्याचे भौगोलिक वैशिष्ट्य आहे. पुणे शहराची रचना ही बशीसारखी आहे. शहराच्या चारही बाजूला टेकड्या आहेत. दिवसा जमीन तापलेली असते. सायंकाळनंतर ही हवा वर जाण्यास सुरुवात होते. त्याचवेळी टेकड्यांवरील थंड हवा जड होऊन खाली येते. आजू बाजूला झाडे व पाणीसाठा मोठा असेल तर हवा तापण्याचे प्रमाण कमी होते. त्यात टेकडीवरुन आलेली थंड हवा याचा एकत्रित परिणाम होऊन रात्रीचे तापमान नेहमीपेक्षा कमी होते. त्यामुळे पुणे शहरातील किमान तापमान कमी असले तरी लोहगावचे किमान तापमान शिवाजीनगरपेक्षा अधिक जाणवते. तसेच पर्वतीवरही उबदारपणा जाणवतो.

विदर्भाच्या बऱ्याच भागात, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात, तर मराठवाड्याच्या तुरळक भागात किमान तापमानाच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.आता सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्याने उष्णता वाढत जाणार आहे. पुढील २ ते ३ दिवस अशीच परिस्थिती राहणार असून त्यानंतर तापमानात वाढ होण्यास सुरुवात होईल असे सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या : –

शेतकरी आंदोलनावर सायना नेहवाल आणि अक्षय कुमारचे ‘कॉपी-पेस्ट’ ट्विट

गुड़मार म्हणजे काय? त्याची लागवड कशी करावी जाणून घ्या

स्टीव्हिया लागवड शेतकर्‍यांसाठी एक फायदेशीर व्यवसाय

“शेतकऱ्यांनो, आपल्या गायी – म्हशींचे फोटो पाठवा आणि कमवा 2000 रुपये”

गोबरधन योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी गोबरधनचे एकात्मिक पोर्टल केले सुरू

Leave a comment