‘शेतकरी आंदोलनाला बळ देण्यासाठी पैसा, दारू पुरवा’
गेल्या अनेक महिन्यांपासून महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला २६ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारामुळे गालबोट लागले होते. या हिंसाचारानंतर काही शेतकरी संघटनांनी आंदोलनातून माघार देखील घेतली होती. त्यामुळे शेतकरी आंदोलन कमकुवत झाल्याची चर्चा सुरू होती.
याच पार्श्वभूमीवर आता शेतकरी आंदोलनाला बळ देण्यासाठी पैसा, दारु पुरवा असे वादग्रस्त वक्तव्य हरियाणातील महिला काँग्रेस नेत्या विद्या देवी यांनी केले आहे.
गेल्या निडणुकीत आपला पराभव झाले आहे. काँग्रेसचं अस्तित्वच संपुष्टात येण्याची भीती आहे. पण शेतकरी आंदोलनाने आपल्या उभारी मिळू शकते. काँग्रेसचा पुनर्जन्म होईल, असे म्हणताच विद्या देवी यांनी प्रत्येकाने आता या आंदोलनासाठी मदत देऊ केली पाहिजे. पैसे द्या, अन्नधान्य द्या, भाजीपाला द्या, तूप द्या एवढंच काय ते दारू ही देऊ शकता, ज्याला जे योग्य वाटतं त्यांनी ती मदत करावी आणि या शेतकरी आंदोलनाला बळ द्यावे, असे वक्तव्य केले आहे.
विद्या देवी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता राकेश टिकैत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. दारूचे शेतकरी आंदोलनात काय काम ? असा सवाल त्यांनी केला आहे. मला माहित नाही त्या असे वक्तव्य का करत आहेत. अशा लोकांचे आंदोलनाशी काहीही देणेघेणे नाही. हे चूकीचे असून, असे करायलाच नको. ते त्यांच्या आंदोलनात काहीही वाटू शकतात, असे टिकैत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या : –
रोहित पवार यांनी शेतकऱ्यांसोबत केला व्हॅलेंटाईन डे साजरा
उडद डाळ खाण्याचे फायदे जाणून घ्या