उत्पादन वाढीसाठी पिकांची योग्य लागवड
वेलवर्गीय भाजीपाला पिके
महाराष्ट्रात वेलवर्गीय भाज्यांमध्ये प्रामुख्याने काकडी, कारली, घोसावळी, दोडका, दुधी भोपळा या प्रमुख भाज्यांचा समावेश होतो. या सर्व भाज्यांची लागवड बियांद्वारे व रुंद अंतर ठेऊन केली जाते. लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसांनी वेलीला वळण देणे व आधार देणे ही महत्वाची कामे असतात. दर्जेदार, व अधिक उत्पादनासाठी वेलीला मंडप किंवा तारेच्या ताटीने आधार द्यावा. कारली, दुधीभोपळा, दोडका, ही कमकुवत वेलवर्गात मोडणारी पिके असून, वेलींना चांगला आधार मिळाला तर त्यांची वाढ चांगली होण्यास मदत होते.
मिरची, वांगी आणि टोमॅटो यांची लागवड
मिरची, टोमॅटो, वांगी या तिन्ही पिकांची रोपे गादी वाफ्यावर करावी. गादीवाफ्यावर बियाणे पेरून झाल्यानंतर साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात रोपांची लागवड केली जाते. या पिकांमध्ये विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दक्षता घ्यावी. मिरचीची लागवड करतेवेळी तिचे उत्पादन मार्च-मे महिन्यात बाजारात येईल, याच दृष्टीने घ्यावे. मिरचीमध्ये फुलेज्योती या जातीमधील मिरच्या झुपक्यात येतात आणि पाने देखील दाट असतात. वांगी या पिकासाठी उंच व डेरेदार वाढ असणारा काटेरी देठ, पांढऱ्या, हिरव्या रंगाची छटा एकत्र असणाऱ्या चकाकीदार फळे येणाऱ्या वाणाची निवड करावी. वांगी पिकास शेणखत व रासायनिक खाते यांचा संतुलित वापर करावा. टोमॅटो पिकासाठी वाण निवडताना अधिक पाने असणारा, उष्ण तापमानात फलधारणा होणारा, फळांना तडे न जाणारा निवडावा. टोमॅटोची लागवड शक्यतो लवकर करावी. कारण उष्ण हवामानात फळधारणा कमी होते.
कोंथिबीर
उन्हाळी हंगामात कमी पाण्यावर येणारे कोथिंबीरचे पिक कमी कालावधीत चांगले पैसे देऊन जाते. दर आठ दिवसांच्या अंतराने याची लागवड करावी.
भेंडी आणि गवार
उन्हाळ्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या या भाज्यांना मागणीसुद्धा अधिक असते. भेंडी लागवड करतेवेळी ‘हळद्या’ रोगास प्रतिकार करणाऱ्या वाणीची निवड करावी, उदा. पुसा, सवानी, परभणी, क्रांती व गवारीसाठी पुसानावबहार, पुसासदाबहार. या पिकांची तोडणी संध्याकाळच्या वेळेस करावी.
आधारासाठी, मंडप आणि ताटी पद्धत
वेलवर्गीय भाज्यांना मंडप किंवा ताटी पद्धत वापरल्यास फळे जमिनीपासून ४ ते ६ फूट उंचीवर वाढण्यास मदत होते. फळे लोंबकळत राहिल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते. हवा आणि सुर्यप्रकाश सारखा मिळाल्यामुळे फळांचा रंग एकसारखा राहण्यास मदत होते. दुधी भोपळा मंडपावर घेतल्यास जमिनीवर घेतलेल्या उत्पन्नापेक्षा अडीच ते तीन पट वाढ होते. मंडप पद्धतीमुळे फवारणी करणे सोपे होते.
राजगिरा, मेथी, माठ यांची लागवड
या लागवडीसाठी पाण्याचा हमखास, सलग पुरवठा असणे आवश्यक असते. या पिकांच्या विक्रीसाठी बाजारपेठ जवळ असायला हव्यात. तसेच वाहतुकीची सोय उत्तम असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने कमी भांडवलात येणारे हे पीक असते.
महत्वाच्या बातम्या : –
‘या’ दिवशी विदर्भात पावसाचा इशारा, विजांसह पावसाची शक्यता
लखनऊमध्ये उघडले हर्बल संग्रहालय
मेरा रेशन अॅपद्वारे आता घरी बसून तुम्हाला किती रेशन मिळेल हे ‘अश्या’ प्रकारे तपासा
जाणून घ्या का आहेत काकडीची साले आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर
मोठी बातमी! शेतीच्या यंत्रांवर मिळत आहे ४० ते ५० टक्के सूट, वाचा संपूर्ण माहिती