औरंगाबाद जिल्ह्यात ६३८५ क्‍विंटल मक्याची खरेदी

0

औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावाने ६३८५ क्‍विंटल मक्याची खरेदी करण्यात आला आहे. मका खरेदीसाठी जिल्ह्यात ११ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत’’, अशी माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा पणन अधिकारी एस. के पांडव यांच्या कडून देण्यात आली आहे. गंगापूर केंद्रावरील २९ शेतकऱ्यांकडून ११८७ क्‍विंटल ५० किलो, खुलताबाद केंद्रावरील १३३ शेतकऱ्यांकडील ५१९७ क्‍विंटल ५० किलो मक्याचा खरेदी केली. हा मका शासनाच्या ताब्यात देण्यात आल्याचेही मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने सांगण्यात आले.

औरंगाबाद जिल्ह्यात मक्याच्या १८५० रुपये या किमान हमीभावाने खरेदीसाठी ११ केंद्रांना मंजूरी मिळाली आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी ४०९ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मका खरेदीसाठी एसएमएस पाठविण्यात आले. त्यामध्ये गंगापूर केंद्रावरील ६५, खुलताबाद ३२९, कन्नड केंद्रावरील १५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यांपैकी १६२ शेतकऱ्यांकडील ६३८५ क्‍विंटल मक्याची खरेदी करण्यात आली.

गंगापूर, खुलताबाद, वैजापूर, कन्नड, पिशोर, फूलंब्री, करमाड, सिल्लोड, सोयगाव, लासूर स्टेशन, तुर्काबाद या केंद्रांचा यामध्ये समावेश आहे. या सर्व केंद्रावरून आतापर्यंत २३६० शेतकऱ्यांनी मक्याची ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यामध्ये गंगापूर केंद्रावरून ५४२, खुलताबाद ६३८, वैजापूर ४६४, कन्नड ३५८, फुलंब्री ११७, करमाड ४८, सिल्लोड १, सोयगाव २८ तर लासूर केंद्रावर नोंदणी करणाऱ्या १६४ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

Leave a comment