दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो, गवारसह भाजीपाल्याचे दर स्थिर

0

अहमदनगर  येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात टोमॅटो, गवारसह भाजीपाल्याचे दर टिकून आहेत. शेवग्याच्या दरात मात्र काहीशी घसरण झाली आहे. भुसारमध्ये सोयाबीन, मुगाची आवक चांगली राहिली, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक कायम आहे. गेल्या आठवडाभरात टोमॅटोची दर दिवसाला ४० ते ५० क्विंटलची आवक होत आहे. १ हजार ते २ हजार रुपयाचा प्रतिक्विंटल दर मिळाला.लसणाची १६ क्विंटलची आवक होऊन ७ हजार ते १२ हजाराचा दर मिळाला. घेवडयाची ३ ते ४ क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते ३ हजाराचा दर मिळाला. हिरव्या मिरचीची ३२ ते ३५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते ३ हजार रुपये, शेवग्याची ४ ते ६ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते २ हजार ८००, शिमला मिरचीची ३० ते ४० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते १ हजार ५०० रुपयाचा दर मिळाला.

कोबीची २५ ते ३० क्विंटलची आवक होऊन ५०० ते १ हजार, काकडीची २० ते २५ क्विंटलची आवक होऊन ५०० ते ९००, गवारची ५ ते ७ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ६ हजाराचा दर मिळाला. दोडक्याची १९ ते २२ क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते २ हजार ५०० रुपये, कारल्याची २० ते २२ क्विंटवची आवक होऊन १ हजार ते २ हजार रुपयाचा दर मिळाला.

वांग्यांची २४ ते ३० क्विंटलची आवक झाली. दर ५०० ते १ हजार रुपये, फ्लॉवरची ३८ ते ४५ क्विंटलची आवक होऊन ४०० ते १ हजार रुपये दर मिळाला. गेल्या आठवडाभरात दर दिवसाला ज्वारीची ३० ते ३५ क्विंटलची आवक होऊन प्रतिक्विंटल १९०० ते २३००, तुरीची ९० ते ११० क्विंटलची आवक होऊन ५१०० ते ५७०० रुपयाचा दर मिळाला.

मुगाची ८० ते १०० क्विंटलची आवक होऊन ४२०० ते ७५००, उडीदाची ६ ते १५ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते सहा हजार, गव्हाची २०० ते २१० क्विंटलची आवक १५५१ ते १६२५ रुपयाचा दर मिळाला. सोयाबीनची ४५ ते ५० क्विंटलची आवक होऊन होऊन ३ हजार ५०० ते ४०५० रुपये दर मिळाला.

Leave a comment