औरंगाबादमध्ये काही भाजीपाल्यांचे दर स्थिर; तर काही भाज्यांच्या दरात घसरण

0

औरंगाबाद – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवडाभरात आवक झालेल्या विविध भाजांच्या दरात घसरणच पहायला मिळाली. तर, काही भाज्यांच्या दरात स्थिरता पहायला मिळाली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये ३० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या दरम्यान वांग्यांची १८० क्‍विंटल आवक झाली. त्यांचे सरासरी दर १००० ते १४०० रूपये प्रतिक्‍विंटल राहिले.

आठवड्यात चार वेळा ५७ ते ७५ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला सरासरी ३५० ते ५०० रूपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. हिरव्या मिरचीची २२१ क्‍विंटल आवक झाली. ३१ ते ५४ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या हिरव्या मिरचीला सरासरी १७५० ते २३०० रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

टोमॅटोची गत आठवडाभरात ५२३ क्‍विंटल आवक झाली. या टोमॅटोला सरासरी ९५० ते १९०० रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. टोमॅटोच्या कमाल दरात चढउतार, तर किमान दरात बऱ्यापैकी स्थिरता पहायला मिळाली. कोथिंबिर, पालक, मेथीच्या दरातही घसरणच पहायला मिळाली.कोबीची आवक २१० क्‍विंटल झाली. २४ ते ५४ क्‍विंटल आवक झालेल्या कोबीचे सरासरी दर ३५० ते ७०० रूपये प्रतिक्‍विंटल राहिले. फ्लॉवरची आवक २६७ क्‍विंटल झाली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये गत आठवड्यात बटाट्यांची १६९८ क्‍विंटल आवक झाली. १९९ ते ४९९ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या बटाट्याचे सरासरी दर २८०० ते ३४५० रूपये प्रतिक्‍विंटल मिळाले. बटाट्याचे दर जवळपास स्थिरच राहिले.भेंडीची एकूण आवक १३० क्‍विंटल झाली. २० ते ३४ क्‍विंटल आवक कमी झाली.

भेंडीला सरासरी १२०० ते १७५० रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. लिंबांची ९३ क्‍विंटल आवक झाली. त्यांनाला सरासरी ५०० ते ६०० रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

 

 

Leave a comment