नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिर
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्यांची आवक १२३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ५००० असा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ३६०० राहिला. दोडक्याची आवक ४६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३३३५ ते ४३७५ दर मिळाला. सर्वसाधारण दर ३८३५ रुपये राहिला.
भेंडीची आवक ४५ क्विंटल झाली. तिला ८३० ते २५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १६७० राहिला. काकडीची आवक ४९३ क्विंटल झाली. तिला १००० ते १७५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १३७५ राहिला.बटाट्याची आवक १६४९ क्विंटल झाली. त्यास १२५० ते २२५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १६०० राहिला.फ्लॉवरची आवक ४९८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते १००० दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ६४० राहिला.
कोबीची आवक ५८० क्विंटल झाली. तिला २१० ते ४१५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २९० राहिले. ढोबळी मिरचीची आवक १०३ क्विंटल झाली. तिला १८७५ ते ३१२५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २६२५ राहिले.भोपळ्याची आवक ६४४ क्विंटल झाली. त्यास २०० ते १००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४३५ राहिला. कारल्याची आवक ५८ क्विंटल झाली. त्यास ३३३५ ते ४१६५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३७५० राहिला.
संत्र्यांची आवक ११२ क्विंटल झाली. तिला १००० ते २००० दर होता. सर्वसाधारण दर १५०० राहिला. पपईची आवक ७० क्विंटल झाली. त्यास ६०० ते १२०० दर होता. सर्वसाधारण दर ९०० राहिला.डाळिंबाची मागणी घटली आहे. ही आवक अवघी १० क्विंटल झाली. त्यास १५०० ते ९००० दर होता. सर्वसाधारण दर ६००० राहिला. बोरांची आवक ३०५ क्विंटल झाली. त्यास ५०० ते १२०० दर मिळाला. सर्वसाधारण दर ८०० राहिला.
महत्वाच्या बातम्या : –
भटक्या गायी आणि म्हशींना लागणार माइक्रोचिप; कैटल फ्री कैपिटल होणार दिल्ली
घरच्या घरी असे तयार करा अग्नी अस्त्र कीटकनाशक
चर्चेआधी शेतकऱ्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, आजच्या बैठकीत तोडगा निघणार ?
शेतकरी आंदोलन: हरियाणातील महिलांनी रॅलीचे नेतृत्व करत ट्रॅक्टरचे स्टेअरिंग घेतले हाती
दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत वाल, घेवड्याच्या दरात सुधारणा
शेतकरी – सरकारमधील चर्चा पुन्हा निष्फळ, 8 जानेवारीला पुढची बैठक