गोंदिया जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी
गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील हरभऱ्यासह इतर रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असल्याचे बोलले जात आहे. तर धान खरेदी केंद्रावरील धान मोठ्या प्रमाणात उघड्यावर पडून असल्यामुळे अवकाळी पावसामुळे धान भिजल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
हवामान विभागाने जिल्ह्यात १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज काहीसा खरा देखील ठरला. जवळपास अर्धा ते पाऊण तास पाऊस झाला. यामुळे वातावरणात दिवसभर गारवा होता. तर दिवसभर ढगाळ वातावरण होते. या पावसामुळे रब्बी पिकांचे प्रमाणात नुकसान झाले.
आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केलेला जवळपास २५ लाख क्विंटल धान उघड्यावर पडला आहे. काही धानाला ताडपत्र्या झाकून ठेवण्यात आले आहे. मात्र केंद्रावर मोठ्या प्रमाणात धान पडून असल्याने काही प्रमाणात धान ओला झाल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या : –
अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
शेतकऱ्यांचे आज देशभर रेल रोको आंदोलन
जाणून घ्या कॉफी पिण्याचे अनेक फायदे….
धान, गहू, हरभरा, डाळी या पिकांची पेरणी एसआरआय पद्धतीने केल्यास कमी किंमतीत मिळेल जास्त उत्पन्न
‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना पंजाबमध्ये राबविण्यात ‘या’ महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता