विद्राव्य खते वापरताना घ्यावयाची काळजी,16 महत्वाच्या सूचना

0

१) १ किलो विद्राव्य ड्रीप खते जसे १९:१९:१९, १२:६१:००, ००:५२:३४ इत्यादी विरघळविण्यासाठी कमीत कमी १५ लिटर पाणी वापरावे.

२) १ किलो ००:००:५० ड्रीप खत विरघळविण्यासाठी कमीत कमी २० लिटर पाणी वापरावे.

३) कॅल्शियम नायट्रेट व कॅल्शियम + बोरॉन मिश्र खत ही ड्रीप खते १३:००:४५ व्यतिरिक्त कोणत्याही खताबरोबर मिसळु नये.

४) सर्व नत्रयुक्त खते वातावरणातील आर्द्रता शोषून घेतात त्यामुळे ही खते उघडे ठेवल्यास ओलावा धरतात.

५) ह्यूमिक ऍसिड व सी विड पावडर पाण्यामध्ये मिसळताना ड्रम मधील पाणी अगोदर चक्राकार ढवळून घ्यावे व त्यानंतर पावडर हळूहळू पाण्यात टाकावी.

६) ह्यूमिक ऍसिड विरघळविण्यासाठी पाण्याचे प्रमाण १०० लिटर प्रति किलो एवढे वापरावे.

७) योग्य मिश्रणासाठी पाण्यामध्ये टाकावीत, उलटे खतामध्ये पाणी टाकू नये.

८) चिलेटेड मायक्रोन्युट्रीएट वापरानंतर पॅकेट सिलबंद करून ठेवावे.

९) खते विरघळविण्यासाठी पाणी स्वच्छ वापरावे.

१०) कोणत्याही खताबरोबर कॅल्शियम, सल्फर व कॉपरयुक्त खते मिसळु नये.

११) फॉस्फरिक अॅसीड बरोबर कोणतेही फवारणी अथवा ड्रिप खत मिसळू नये.

१२) ठिबक मधुन खते द्यायची संपल्यानंतर 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ पाणी देऊ नये.

१३) काही अपवाद वगळता सर्व किटकनाशक व बुरशीनाशकाबरोबर फवारणी खते, बायोस्टिम्युलंट मिसळून फवारता येतात. परंतु मिसळण्यापुर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

१४) विद्राव्य खतांच्या उत्कृष्ट परिणामांसाठी कंपनीच्या शिफारशीप्रमाणेच उत्पादनाचा वापर करावा.

१५) प्रत्येक पिकांच्या प्रस्तावित शिफारसी प्रमाणे (शेड्युलप्रमाणे) खतांचा वापर केल्यास अनावश्यक खर्च टाळून खतांचे परिणाम मिळतील.

कास्तकार ग्रुप समिती महाराष्ट्र राज्य

विठ्ठल लहाने

Leave a comment