ट्रॅक्टर परेड रोखण्यासाठी पोलीस चक्क रस्त्यावरच बसले

0

गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये अनेक बैठका झाल्या असून शेतकरी मात्र आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. याच दरम्यान दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात ट्रॅक्टर मार्च काढला आहे.

याला पोलिसांनी परवानगी दिलेली असली तरीही काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचा प्रकार घडला आहे. काही ठिकाणी पोलीस आणि शेतकऱ्यांचे जत्थे आमने-सामने आले असल्याचे पाहायला मिळाले.

पोलिसांनी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली, याच दरम्यान ही ट्रॅक्टर परेड रोखण्यासाठी पोलीस चक्क रस्त्यावरच बसलेले पाहायला मिळाले. नांग्लोई भागातील मुख्य रस्त्यावरुन शेतकऱ्यांची नियोजित ट्रॅक्टर परेड जाणार होती. मात्र, पोलिसांनी सुरक्षेच्या कारणावरुन ही परेड रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला.

शेतकऱ्यांनी पोलिसांकडून लावण्यात आलेले बॅरिकेड तोडले . यामुळे पोलिसांनी तिथे लाठीचार्ज केला. दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराजवळचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी बॅरिकेड लावले होते. मात्र, काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने बॅरिकेड तोडून दिल्लीकडे घुसण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करत या शेतकऱ्यांना माघारी जाण्यास भाग पाडले.

एकीकडे 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना दुसरीकडे कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅली काढली आहे. दिल्लीच्या सीमेवर सध्या 60000 हून अधिक ट्रॅक्टर उभे ठाकले आहेत. परंतू, सिंघू आणि तिक्री बॉर्डरवर पोलिसांनी रातोरात बॅरिकेड टाकून रस्ते अडविल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या : –

बटाटा पिकावरील रोग व व्यवस्थापन

फळाचे सालही आपल्याला अनेक आजारांपासून वाचवू शकतात

लाल सफरचंद किंवा हिरवे सफरचंद, आपल्या आरोग्यासाठी काय फायदेशीर आहे?

२०२० इतिहासातील सर्वाधिक उष्ण वर्ष

राज्यातील किमान तापमानात चढउतार

Leave a comment