पीएम शेतकरी सन्मान निधीच्या यादीत नाव येण्यासाठी करा ‘हे’ काम

0

पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. सात हप्त्यांमध्ये मोदी सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांना पैसे पाठवले आहेत. लवकरच आता आठवा हप्ता देखील पाठवण्यात येणार असल्याची महती देण्यात आली आहे.

दरम्यान सरकारकडून या योजनेच्या व्यवस्थेमध्ये काही बदल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्यांच्याकडे वडिलोपार्जित जमिनीत हिस्सा आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर आता पीएम शेतकरी सन्मान निधीचा फायदा त्यांना घेता येईल ज्यांच्या नावावर शेत आहे.

या योजनेअंतर्गत वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, तर दुसरा हप्ता हा  1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान पाठवला जातो. याही वर्षी टप्प्याटप्प्याने पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातील असे देखील सांगण्यात आले आहे.

या योजनेत पारदर्शकता यावी याकरता सरकारने अनेक नवीन पाऊल उचलले आहे. शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत नवीन नोंदणीसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना आता अर्जाच्या नमुन्यात आपला भूखंड क्रमांक नमूद करावा लागणार आहे.

करू शकता ऑनलाइन रजिस्ट्रेशन

या योजनेत नोंदणी करणे अगदी सोपे आहे.

– याकरता तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल

– त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या ‘फार्मर कॉर्नर’ या टॅबवर क्लिक करा

– याठिकाणी ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक टाका

– कॅप्चा कोड प्रविष्ट करून तुमचे राज्य निवडा, त्यानंतरच प्रोसेस पुढे जाईल

– तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील विचारला जाईल

– ही माहिती भरल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

महत्वाच्या बातम्या : –

सेंद्रिय खतांचे प्रकार 

पीक उत्पादन वाढवायचे? तर मग मधमाश्‍यांची घेऊ काळजी!

‘या’ खतांच्या जोड्या कधीही एकमेकात मिसळू नये अन्यथा होऊ शकते नुकसान 

गटशेती- समृद्धीचा मार्ग, गटशेती म्हणजे काय? जाणून घ्या

‘शेतकरी आंदोलनाला बळ देण्यासाठी पैसा, दारू पुरवा’

Leave a comment