PM Kisan Yojana : आता छोट्या शेतकऱ्यांना मिळेल आजीवन 3000 रुपयांची पेन्शन

0

पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत, लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आता 3000 रुपयांची पेन्शन मिळेलपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या योजना सुरू केल्या आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारता येईल. यासह, शेतकरी शेतीशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्त होऊ शकतात. या अंतर्गत केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना योजना सुरू केली आहे.

या योजनेचे नाव किसान मानधन योजना असे ठेवण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेअंतर्गत, देशातील सर्व लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वृद्धापकाळात योग्य जीवन जगण्यासाठी सरकारकडून पेन्शन दिली जाते. तसेच, ही योजना केंद्र सरकारने 2019 मध्ये सुरू केली होती. या अंतर्गत देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण होताच त्यांना दरमहा 3000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

18 ते 40 वयोगटातील शेतकरी अर्ज करू शकतात
पीएम किसान मानधन योजना किसान पेन्शन योजना म्हणूनही ओळखली जाते. किसान पेन्शन योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. 2022 पर्यंत सुमारे 5 कोटी छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेद्वारे घेण्याचं केंद्र सरकारचे लक्ष्य आहे.

जर लाभार्थी मरण पावला तर पत्नीला दरमहा 1500 रुपये मिळतील
पीएम किसान मानधन योजनेचा लाभ त्या लाभार्थ्यांना दिला जाईल ज्यांच्याकडे दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेतजमीन आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थीचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास लाभार्थीच्या पत्नीला दरमहा 1500 रुपये दिले जातील.

Leave a comment