मिरची लागवड मार्गदर्शन

0

लागवडीचा हंगाम व जमीन
खरीप लागवड जून-जुलै, तर उन्हाळी लागवड जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात करावी. मिरची लागवडीसाठी चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. पावसाळयात तसेच बागायती मिरचीसाठी मध्‍यम काळी आणि पाण्‍याचा उत्‍तम निचरा होणारी जमिन निवडावी. उन्‍हाळयात मध्‍यम ते भारी जमिनीत मिरचीची लागवड करावी. चुनखडी असलेल्‍या जमिनीतही मिरचीचे पिक चांगले येते.

हिरव्या मिरची साठी ज्वाला, एन. पी. – 46-ए या जाती, तर पिकलेल्या लाल मिरचीसाठी सी. ए. 960, पंत सी-1, जी-3, अग्निरेखा, तेजस, फुले सूर्यमुखी, फुले ज्योती, अर्का लोहित, कोकणकीर्ती या जातींची निवड करावी.
उन्हाळी लागवडीसाठी ज्वाला आणि एन. पी. – 46 या जातींची निवड करावी. इतर लोकल कंपनी चे वाण बाजारपेठेत उपलब्ध आहेत (आपल्या विभागात बाजारपेठेत मागणीनुसार वाणाची निवड करावी )

एकरी बियाणे
४०० ते ६०० ग्राम

लागवडीसाठी अंतर

उंच आणि पसरट वाढणा-या जातींची लागवड ६० बाय ६० सेमी अंतरावर आणि बुटक्‍या जातींची लागवड ६० बाय ४५ सेमी अंतरावर करावी. कोरडवाहू मिरचीची लागवड ४५ बाय ४५ सेमी अंतरावर करावी. रोपांची सरीवरंबा पध्‍दतीवर लागवड करावी.

रोपे गादीवाफयातून काढल्‍यानंतर लागवडीपूर्वी रोपांचे शेंडे १० लिटर पाण्‍यात २०० मिली आशिर्वाद दशावतार + २० मिली क्लोरोपायरीफॉस + २५ ग्रॅम एम ४५ + ३० ग्रॅम पाण्‍यात मिसळणारे गंधक ८० टक्‍के मिसळलेल्‍या द्रावणात बुडवून लावावेत.

खत व्यवस्थापन व रोग किडी व्यवस्थापन

  • पूर्वमशागत करताना जमिनीत १२ ते १४ गाड्या चांगले कुजलेले शेणखत द्यावे .
    बेड तयार करताना त्यामध्ये आशिर्वाद भुसम्राट सेंद्रिय खत 2टन + निंबोळी खत २०० किलो + कोसावेट ३ किलो एकरी द्यावे.
  • बेड ओले करून घ्यावे लागवड वापसा अवस्थेत करावी रोप लावल्यानंतर कडेची माती चांगली दाबून घ्यावी.
    डंपिंग, मर, रोप कुरतडनार्या किडिंपासुन संरक्षणासाठी आशिर्वाद दशावतार 5लिटर 200लिटर पाण्यात मिसळून सोडावे व 3 दिवसांनी आशिर्वाद अर्थप्लस 10लिटर/एकर प्रमाने ड्रिपने द्यावे.
  • विद्राव्य लिक्वीड सेंद्रिय खत ठिबकमधून आशिर्वाद प्लांट न्युट्रिफुड २लिटर ३ दिवसाच्या अंतराने ८ वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून ५ ते ३० दिवस ) ७ व्या दिवशी फवारणी आशिर्वाद दशावतार 10मिलि/लिटर+एम ४५- ३० ग्राम + असाटाफ ३० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • १० व्या दिवशी पिवळे चिकट सापळे ५ व निळे चिकट सापळे लावावे, चिकट सापळे यावर असलेल्या किडीचा प्रादुर्भाव नुसार फवारणी करावी.
  • पुढील फवारणी रोग व किडी प्रादुर्भाव नुसार कीटकनाशक व बुरशीनाशक वातावरणातील बदलानुसार आलटून पालटून फवारणी घ्यावी.
  • रसशोषक किडींसाठी आशिर्वाद दशावतार फवारावे. फळपोखरणारी अळी प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर खराब झालेली फळे काढून टाकावी व नष्ट करावी, नियंत्रणासाठी आशिर्वाद दशावतार, स्पिनोसॅड ४५ एस सी (Tracer) ७ मिलि किंवा सायंट्रेनिलिप्रोल १०.२६% ओ.डी.(Benevia) १५ मिलि किंवा अलिका १० मिली १५ लीटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. केवडा, भुरी ,मर या बुरशीजन्य रोगांसाठी आशिर्वाद दशावतार, साफ किंवा अवतार किंवा एम ४५ फवारावे. एकच औषध पुन्हा पुन्हा न फवारता आलटून पालटून आवशकतेनुसार फवारावे.
  • १५ व्या दिवशी आशिर्वाद लिक्विड सिलिकॉन १५० मिली १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी १५ दिवसाच्या अंतराने काढणीपर्यंत करावी.
  • २५व्या दिवशी आशिर्वाद दशावतार १५०मिली + अलिका १० मिली + स्कोर ८ मिली /१५ लिटर
    विद्राव्य खत ठिबकमधून १२:६१:०० ३ किलो +आशिर्वाद प्लांट न्युट्रिफुड २लिटर ३ दिवसाच्या अंतराने ८ वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून २५ ते ५० दिवस ) ३२ व्या दिवशी कोसावेट ३ किलो + मॅग्नेशिअम सल्फेट ५ किलो ठिबकमधून द्यावे.
    ३५ व्या दिवसी आशिर्वाद अर्थप्लस १०लिटर/एकर ४० व्या दिवशी कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो ठिबक मधून द्यावे त्यानंतर २ दिवसांनी बोरॉन १५ ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • ४५ दिवशी आशिर्वाद कल्चर ठिबकमधुन सोडावे. विद्राव्य लिक्वीड सेंद्रिय खत ठिबकमधून आशिर्वाद प्लांट न्युट्रिफुड २लिटर ४ दिवसाच्या अंतराने आवश्यकते प्रमाणे द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून ५० ते ११० दिवस )५५ व्या व ६५ व्या दिवशी टाटा बहार ३० मिली + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य १५ ग्राम / १५ लिटर + आशिर्वाद दशावतार १५०मिली/१५ लिटर.
  • ५५ ते ६० दिवसादरम्यान झाडांना मातीची भर देऊन घ्यावी.
  • ६० ते ६५ व्या दिवशी आशिर्वाद अर्थप्लस १०लिटर ठिबकमधून द्यावे.
  • आवश्यक फवारणी मिरची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी मिरची फळ आल्यानंतर आशिर्वाद दशावतार १०मिलि प्रती लिटर + कॅल्शिअम नायट्रेट ३ ग्राम + बोरॉन १ ग्राम प्रति लिटर १५ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
    ७२ व्या दिवशी आशिर्वाद दशावतार १५०मिली/१५ लिटर +ओबेरोन १५ मिली /१५ लिटर.
  • ८५ व्या दिवशी कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो ठिबक मधून द्यावे त्यानंतर २ दिवसांनी बोरॉन १५ ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.(विद्राव्य खताबरोबर देऊ नये )
  • वातावरणातील रोग व किडी सध्यपरिस्थितीनुसार फवारणी घ्यावी.

काढणी व उत्पादन

हिरव्‍या मिरचीची तोडणी साधारणपणे लागवडीनंतर अडिच महिन्‍यांनी सुरु होते. पुर्ण वाढलेल्‍या व सालीवर चमक असलेल्‍या हिरव्या फळांची तोडणी देठासह ८ ते १० दिवसांच्‍या अंतराने करावी. साधारपणपणे हिरव्‍या मिरच्‍यांची तोडणी सुरु झाल्‍यानंतर 3 महिने तोंडे सुरू राहातात. अशा प्रकारे १० ते १२ तोडे सहज होतात. वाळलेल्‍या मिरच्‍यांसाठी त्‍या पूर्ण पिकून लाल झाल्‍यावरच त्‍यांची तोडणी करावी.जातीपरत्‍वे ( बागायती) हिरव्‍या मिरच्‍यांचे एकरी ३२ ते ४० क्विंटल उत्‍पादन मिळते. वाळलेल्‍या लाल मिरच्‍यांचे उत्‍पादन एकरी ३.५ ते ४ क्विंटल निघते.

विक्रम घोलप
7020845477

Leave a comment