कृषि क्षेत्रातील ‘या’ व्यक्तींना पद्म पुरस्कार
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला “पद्म पुरस्कार 2021” काही लोकांना सन्मानित करण्यात आले. कोणत्याही विशिष्ट क्षेत्रांमध्ये आपली विशेष सेवा देणाऱ्या व्यक्तींना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. यावर्षी जवळपास 102 लोकांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून यामध्ये चार व्यक्तींचे कृषी क्षेत्रामध्ये विशेष योगदान आहे.
नानाद्रो बी मारक
नानाद्रो बी मारक हे मेघालय राज्यातील पश्चिम गारो हिल्स येथे राहणारे शेतकरी आहेत. ते मुख्यत्वे काळी मिरचीचे उत्पादन घेतात. त्यांचे वय ६१ वर्षापेक्षा जास्त आहे. परंतु अजूनही येथे काळी मिरचीची शेती करून तिचे उत्पादन घेतात. काही दिवसांअगोदर त्यांनी ३३०० मिरची रोपांची लागवड केली होती. २०१९ मध्ये त्यांनी जवळ-जवळ ८ लाख रुपयांचे काळी मिरचीचे उत्पादन घेतले होते.
प्रेमचंद शर्मा
रामचंद्र शर्मा यांचे नाव उत्तराखंड राज्यात सन्मानाने घेतले जाते. त्यांना डाळिंब शेतीसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डाळिंब पिकामध्ये कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे मिळेल या बाबतीत त्यांचे कार्य आहे. वर्ष २००० मध्ये त्यांनी डाळिंबाच्या प्रगत दीड लाख जातींची रोपांचे नर्सरी तयार केली होती.
चंद्रशेखर सिंह
नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा क्षेत्रामधून आलेले कृषी वैज्ञानिक चंद्रशेखर सिंह यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यांना या अगोदर केंद्र आणि राज्य सरकारचे बरेच सन्मान मिळाले आहेत. चंद्रशेखर यांना उत्पादनाची गुणवत्ता वाढवणे आणि शेतकऱ्यांना विशेष प्रकारचे शिक्षण देणे या कार्यासाठी हा सन्मान दिला गेला. चंद्रशेखर सिंह शेतकऱ्यांसाठी डिजिटल पोर्टल हे चालवतात. जे कृषी शाईन डॉट कॉम या नावाने प्रसिद्ध आहे.
पप्पा मल
तमिळनाडू राज्याच्या महिला शेतकरी पप्पा मल यांचे वय जवळ-जवळ एकशे पाच वर्षे आहे. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दक्षिण मध्ये त्यांना लेजेंडरी वुमन या नावाने ओळखले जाते. पप्पा मला यांना हा पुरस्कार जैविक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जैविक उत्पादन निर्माण करण्यासाठी दिला गेला.
महत्वाच्या बातम्या : –
उन्हाळ्यात जनावरांना होणारे आजार आणि त्यावरील उपाययोजना
मुंग्या या शेतकऱ्यांचे एक मित्र किटक
युरिया आणि सल्फर- एक जादुई रसायन
जाणून घ्या ठिबक सिंचनाचे अन्य फायदे