Packing:बाजारपेठेत ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी आहे उत्पादनाची पॅकिंग महत्त्वाची, जाणून घेऊ पॅकेजिंग घटकांबद्दल

0

आपण आपल्या शेतामध्ये उत्पादन घेतो.त्याचा दर्जादेखील चांगला असतो. परंतु अजूनही बरेच शेतकरी आपल्या शेतमालाची गुणवत्ता टिकावी तसेच त्याला बाजारपेठेत चांगली मागणी यावी याकडे अजूनही हवे तेवढे लक्ष देत नाहीत. बाजारपेठेतील जी बदल आहेत त्याप्रमाणे आपल्यात बदल करणे फार गरजेचे आहे.

जर आपल्याकडील बाजारपेठेचा विचार केला तर अजूनही धान्य, भाजीपाला आणि फळे थेट ग्राहकांच्या पर्यंत विकली जातात.तसेच विविध प्रकारचे दुग्धजन्य पदार्थतसेच मिठाई आपण दुकानातून विकत घेतो. तसेच बाजारामध्ये आपल्याला फळांचे काप, वाळवलेला भाजीपाला, मसाल्याच्या आर्क, लोणची वगैरे पदार्थ रेडी टू इट आपल्याला मिळतात.

तसेच बरेच शेतकरी फुल शेती करतात. आपल्याकडे फुलांची बाजारपेठ पाहता ताजी फुले थेट ग्राहकांना विकली जातात. फुलांच्या बाबतीत जर आपण शहराकडील बाजारपेठेचा विचार केला तर  फुलांचा अर्क, तेल आणि सुकवलेली फुले यांना चांगली मागणी आहे. या सगळ्या शेतमालाला मध्ये बदलत्या शहरी आणि ग्रामीण लोकजीवन याप्रमाणे वेगवेगळ्या उत्पादनांना चांगली मागणी आहे. परंतु बाजारपेठेत आपले उत्पादन टिकावे आणि त्याकडे ग्राहकांचे लक्ष वेधले जावे यासाठी आपल्या शेती उत्पादनांचे पॅकिंग एक महत्त्वाची गोष्ट आहे. या लेखात आपण शेतमालाच्या पॅकिंग विषयी काही गोष्टी जाणून घेऊ.

शेतमालासाठी योग्य पॅकिंग महत्त्वाचे..

  • पदार्थाचे स्वरूप,संबंधित शेतमालाचा वाहतुकीचा प्रकार आणि टिकवणक्षमता यानुसार पॅकिंग घटकांचा वापर करावा.
  • पॅकिंग केलेला शेतमाल किंवा पदार्थ कोणत्या प्रकारच्या गोदामांमध्ये किंवा शीतगृह मध्ये पाठविणार आहेत,त्यानुसार पॅकेजिंग मध्ये बदल होतात.
  • बऱ्याचदा वाहतुकीमध्ये पुन्हा वापरता येतील अशा पद्धतीच्या पॅकेजिंग घटकांचा वापर केला जातो.
  • शेतमालाचे स्वरूप कोणत्या प्रकारच्या आहे हे लक्षात घेऊन पॅकेजिंग मधूनही वायुविजन योग्य प्रकारे होईल अशा पद्धतीचे घटक वापरले जातात. यामध्ये शक्यतो पर्यावरणाला धोका होणार नाही अशा प्रकारचे पॅकेजिंगचे घटक वापरणे आवश्यक असते.

विविध प्रकारचे पॅकेजिंग साहित्य( शेतमालाचे प्रकारानुसार)..

  • नैसर्गिक रित्या भाजीपाला वाहतुकीसाठी तागाच्या पिशव्या किंवा प्लास्टिक ट्रे वापरली जातात.
  • दुग्धजन्य पदार्थांची पॅकिंग कंटेनर मध्ये केली जाते. दुग्धजन्य पदार्थांच्या पॅकेजिंगसाठी स्वतंत्र नियमावली असल्यामुळे त्या गुणवत्तेनुसार पॅकेजिंग करावे लागते.
  • केळी तसेच सुकामेव्याच्या पॅकिंगसाठी सीएफबि बॉक्स वापरतात.
  • रेडी टू इट प्रकारचे खाद्यपदार्थ, कोरड्या वनौषधी तसेच मसाले हे प्लास्टिक पाऊस मध्ये पॅकिंग करतात.
  • जेली, जॅमआणि मला सारखे पदार्थ हे प्लास्टिक कंटेनर, काच कंटेनर इत्यादीमध्ये पॅकिंग करतात. लोणचे काचेच्या बाटलीमध्ये पॅक केले जाते.
  • फुलांच्या वाहतुकीच्या बाबतीत अपेडा ने  काही शिफारशी केलेल्या आहेत त्यांचे त्याच शिफारशीत केलेल्या बॉक्समधून वाहतूक करणे अपेक्षित आहे.
  • विविध प्रकारचे धान्य तसेच डाळी यांच्या पॅकिंगसाठी किरकोळ बाजारात शक्यतो पिशव्यांचा वापर केला जातो.घाऊक  बाजारामध्ये धान्य हे तागाच्या पिशव्या किंवा  विणलेल्या पिशव्यांमध्ये भरले जाते.

विविध प्रकारचे पॅकेजिंग चे घटक

  • तागाच्या धाग्यांचा वापर
  • पेपर
  • प्लास्टिक
  • कापूस धाग्यांचा  वापर
  • लोखंडी बॉक्स
  • काचेच्या बाटल्या
  • बॉक्स कंटेनर
  • मोठ्या आकाराच्या पिशव्या
  • लाकडी कंटेनर
  • विणलेली पोती
  • फॉम जाळी
Leave a comment