सात राज्यांमध्ये बर्ड फ्लू साथीचा फैलाव; महाराष्ट्रही झाला सतर्क
देशातील केरळ, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा, गुजरात या सात राज्यांमध्ये बर्ड फ्लू साथीचा फैलाव झाला आहे. ही साथ महाराष्ट्रासह आणखी राज्यांत पसरू नये, यासाठी अतिशय दक्षता घेण्यात येत आहे.पक्ष्यांतूनच बर्ड फ्लूच्या विषाणूचे माणसांत संक्रमण होण्याची शक्यता असल्याने व या आजाराने मरण पावलेल्यांचे प्रमाणही अधिक असल्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आणखी कोणत्या राज्यांत बर्ड फ्लूची साथ पसरण्याचा धोका आहे, याचा अंदाज घेऊन केंद्रीय पशुसंवर्धन खात्याने विविध ठिकाणी पाहणी सुरू केली आहे. तर दिल्लीमध्ये कोंबड्या किंवा अन्य पाळीव पक्षी आणण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
आधीच सारे जग कोरोना साथीच्या विळख्यात सापडले असताना, आता बर्ड फ्लूने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोंबड्या व अंड्यांच्या किमती गेल्या काही दिवसांत घसरल्या आहेत. चीनमध्ये १९९६ साली सर्वप्रथम बर्ड फ्लूची लागण झाली होती. त्यानंतर, आजतागायत जगातील विविध भागात बर्ड फ्लूची साथ डोक वर काढत असते. २००६ मध्ये महाराष्ट्रात नंदूरबार येथे बर्ड फ्लू पसरला होता. बर्ड फ्लूच्या विषाणूचे माणसामध्ये संक्रमण झाल्यानंतर पहिला रुग्ण हाँगकाँगमध्ये १९९७ साली सापडला होता.
कुठेही पक्षी मरण पावल्याची घटना नजरेस आली तर महाराष्ट्रासह विविध राज्यांतील पशुसंवर्धन खात्यांकडून त्याची तातडीने दखल घेतली जात आहे. घटनास्थळी जाऊन सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या जात आहेत.
मध्य प्रदेशमधील १३ जिल्ह्यांमध्ये फैलाव झाला आहे. पंजाबमध्ये अन्य राज्यांतून कोंबड्यांची आयात करण्यास १५ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.उत्तर प्रदेशमधील संग्रामपूर येथेही सहा कावळे मरण पावल्याचे निदर्शनास आले. कानपूरचे प्राणी संग्रहालयही काही दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे.
चंदीगडमध्ये बर्ड फ्लूची साथ पंजाबमध्ये पसरू नये, म्हणून तेथील राज्य सरकारने अन्य राज्यांतून कोंबड्या, तसेच इतर पाळीव पक्षी आयात करण्यास १५ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. पंजाबशेजारील हरयाणा, हिमाचल प्रदेशमध्ये बर्ड फ्लू साथीचा फैलाव झाल्यामुळे पंजाब सरकार सतर्क झाले होते. या साथीचा लवलेशही पंजाबमध्ये नसला, तरी तेथील राज्य सरकार कोणताही धोका स्वीकारण्यास तयार नाही.
महत्वाच्या बातम्या : –
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 2192 कोटींचा निधी ‘वितरित’; वडेट्टीवार
‘या’ तारखेपासून देशभरात होणार लसीकरणाला सुरुवात
‘या’ तारखेपासून देशभरात होणार लसीकरणाला सुरुवात
बर्ड फ्लूमुळे ग्राहकांनमध्ये वाढली भीती, चिकन 45 रुपयांनी स्वस्त