नागपूरमध्ये संत्राच्या दरात मोठी तेजी
विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या संत्र्याच्या आंबिया बहारातील आवक सध्या होत आहे. सुरुवातीला ८०० ते १००० रुपये क्विंटल असलेल्या संत्र्याचे व्यवहार आता २००० ते २४०० रुपये क्विंटलवर पोचल्याची माहिती देण्यात आली आहे. मोठ्या आकाराच्या संत्रा फळांना हा दर मिळत आहे. बाजारातील संत्र्याची आवक १२०० क्विंटलची आहे. बाजारात मोसंबीची देखील आवक होत असून त्याचे दर ३००० ते ३५०० रुपये क्विंटलवर पोचले आहेत.
आता शेतकरी मृगातील संत्रा देखील विक्रीसाठी आणत आहेत. आंबिया बहारातील संत्र्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. ज्या शेतकऱ्यांनी व्यवस्थापनाच्या माध्यमातून संत्रा झाडावर ठेवला त्यांना या दरातील तेजीचा फायदा होत आहे.
डाळिंब ५००० ते १२ हजार रुपये क्विंटल असून आवक ४१२ क्विंटलची होती. बाजारात बटाट्याची आवक ३००० क्विंटलवर आहे. बाजारात केळीची आवक २२ क्विंटलच्या घरात आहे. केळीला कमीत कमी ४५० तर जास्तीत जास्त ५५० रुपये इतका दर मिळत आहे. मोसंबीला २५०० ते ३००० रुपये दर होता. मोसंबीची आवक १००० क्विंटलची होती. त्यानंतरच्या काळात मोसंबीचे दर ३००० ते ३८०० रुपयांवर पोचले. आता ३००० ते ४००० रुपयांवर मोसंबी दर स्थिर आहेत. द्राक्षाचे व्यवहार ४००० ते ६००० रुपये क्विंटलने होत असून आवक १८९ क्विंटलची आहे.
महत्वाच्या बातम्या : –
‘या’ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे मिळणार ४ कोटी 64 लाख रुपये
शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी काही उपाय
जोपर्यंत आमच्या बाजूने निकाल लागणार नाही पर्यंत लस घेणार नाहीत
ढोबळी मिरचीला होणारे रोग आणि त्यावरील उपाय
गव्हाचे तेल आरोग्यासाठी खूप फायदेशीर