कृषी कायद्याविरोधात विरोधी पक्षांची एकजूट, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकणार

0

आजपासून (29 जानेवारी) संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. मात्र अधिवेशनाआधीच विरोधी पक्षांनी मोदी सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. कृषी कायद्याविरोधात 16 विरोधी पक्ष एकत्र आले आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनमधील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी कायद्याला विरोध म्हणून विरोधकांनी हा निर्णय घेतला आहे. या पक्षांमध्ये काँग्रेससह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अशा 16 पक्षांचा समावेश आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकणाऱ्या पक्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जेकेएनसी, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, सीपीआय (एम), सीपीआय, आययूएमएल, आरएसपी, पीडीप, एमडीएमके, केरळ काँग्रेस, अेआययूडीएफ या राजकीय पक्षांचा समावेश आहे.

या बहिष्काराबाबत माहिती देताना काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, या निर्णयामागील सर्वात मोठे कारण म्हणजे संसदेत विरोधी पक्षांना विश्वासात न घेता जबरदस्तीने हे कायदे मंजूर करण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या : –

शेतकरी आंदोलनाबाबत राहुल गांधींनी मांडली भूमिका

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अण्णा हजारे करणार उपोषण

कृषी कायदे मागे घेतले नाहीत तर मी आत्महत्या करेन – राकेश टिकैत

प्रचलित पेरणी पध्दतीने लागवड करतांना सोयाबिन पिकाच्या मुख्य समस्या 

बंद केलेली मका खरेदी सुरू, ३१ जानेवारीपर्यंत सुरु राहणार खरेदी

Leave a comment