केवळ काँग्रेसच रक्ताने शेती करू शकते – नरेंद्रसिंह तोमर
जगाला माहितीये की पाण्याने शेती केली जाते. मात्र रक्ताने शेती केवळ काँग्रेसच करू शकते. भाजप रक्ताने शेती करू शकत नाही, अशा शब्दात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. ते राज्यसभेत कृषी कायद्याच्या समर्थन करताना बोलत होते.
कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. तर कायदे रद्द करणार नसल्याचे देखील केंद्राने म्हटले आहे.
कृषी कायद्यात काय चूक आहे ? हे आपण मागील दोन महिन्यांपासून विचारत आहोत. मात्र त्याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. कायद्यात काय चूक आहे ? हे शेतकरी नेत्यांनी सांगावे, असेही तोमर म्हणाले. तसेच, कृषी कायदे लागू केले तर इतर लोक त्यांची जमीन ताब्यात घेतली, अशी शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचेही ते म्हणाले.
नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, नव्या कृषी कायद्यांना विरोध फक्त एका राज्यापुरता मर्यादित आहे. शेतकऱ्यांना भडकवले जात आहे. शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांना नव्या कृषी कायद्यांमधील एक त्रृटी दाखवण्यास अपयश आले आहे.
महत्वाच्या बातम्या : –
पुणे ठरले सर्वात थंड शहर, पुढील दोन – तीन दिवस तापमानातील घट कायम राहणार
शेतकरी आंदोलनावर सायना नेहवाल आणि अक्षय कुमारचे ‘कॉपी-पेस्ट’ ट्विट
गुड़मार म्हणजे काय? त्याची लागवड कशी करावी जाणून घ्या
स्टीव्हिया लागवड शेतकर्यांसाठी एक फायदेशीर व्यवसाय
“शेतकऱ्यांनो, आपल्या गायी – म्हशींचे फोटो पाठवा आणि कमवा 2000 रुपये”