कांदा लागवड ते कांदा काढणी व्यवस्थापन

0

रब्बी हंगामात १०’ x १० सेंमी. अंतरावर लागवड करावी. लागवडीपूर्वी १० लिटर पाण्यात १० ग्रॅम कार्बन्डॅझिम व १० मिलि. प्रोफेनोफॉस किंवा फिप्रोनिल टाकून द्रावण करावे. रोपाचे शेंडे कापून या द्रावणात बुडवून लागवड करावी.

तण नियंत्रण

कांदा रोपलागवडीनंतर खुरपणीसाठी खूप खर्च येतो. खुरपणीमुळे मुळाशी हवा खेळती राहून कांदा चांगला पोसतो. रब्बी २५ दिवसांनी ऑक्झफ्लोरफेन ७.५ मिलेि. व क्युझेंलोफॉप इथाईल १o मिलिं. प्रतेि १० लिटर पाणी या प्रमाणात तणनाशकाची एकत्रित फवारणी करावी. त्यानंतर ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी.

खत व्यवस्थापन

कांदा पिकास हेक्टरी ४0 तें ५0 बैलगाड़या शेणखत व शिफारस केल्याप्रमाणे रासायनिक खत हेक्टरी १oo किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाशपैकी अर्धा नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीपूर्वी वाफ्यात मातीमध्ये %मिसळून द्यावे. राहिलेले ५० किलो नत्र ٪३० व ४५ दिवसांनी एक खुरपणी करून द्यावे. साठ दिवसांनंतर कांदा पिकास कोणतेही वर खत देऊ नये.

पाणी व्यवस्थापन

जमीन कोरडी असताना लागवड केल्यास वाढीबरोबर पाण्याची गरज वाढते. कांद्याची वाढ पूर्ण होऊन पाने पिवळी पडून माना पडू लागल्याबरोबर पाणी तोडावे. रब्बी हंगामातील पिकांना शेवटी पाण्याची कमतरता भासते. त्यासाठी ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. कांदाकाढणीपूर्वी तीन आठवडे पाणी तोडावे व ५० टक्के झाडांच्या माना पडल्यावर कांदा काढणीस सुरुवात करावी.

रोग व किडींचे व्यवस्थापन :

कांदा पिकावर रब्बी हंगामात प्रामुख्याने तपकिरी करण्याचा प्रादुर्भाव आढळून येतो. पिवळसर तपकिरी रंगाचे लांबट चट्टे पानावर बाहेरील भागावर दिसू लागतात. चठ्ठयांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात.
१५ ते २0 0 सें. तापमान व ८o ९० टक्के आद्रतेमुळे बुरशीची वाढ झपाट्याने होते. फेब्रुवारी- मार्च महिन्यांत पाऊस किंवा ढगाळ वातावरण या रोगास फारच पोषक ठरते.

तसेच, याच ऑकालावधीत जांभळा करपा रोगाचाही प्रादुर्भाव होतो. या रोगामुळे चठ्ठयांचा मधला भाग सुरुवातीस जांभळट होऊन नंतर काळपट पाने करपतात. फुलकिडे ही कांदा पिकाचे नुकसान करणारी मुख्य कोड आहे. या किडीची पिले व प्रौढ कीटक पानातील ठिपके पडतात. असंख्य ठिपके जोडले गेल्यामुळे पाने वाकडी होऊन वाळतात. फुलकिड्यांनी केलेल्या जखमांमधून करपा रोगाच्या बुरशीस सहज शिरकाव करता येतो. फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढल्यास रोगांचे प्रमाणही वाढते.

कोरडी हवा आणि २५ ते ३o o सें. तापमानात या किडीचे प्रमाण जास्त असते. करपा व फुलकिडे यांच्या एकत्रित रोग व कोड नियंत्रणासाठी कांदा लागवडीनंतर १o-१५ दिवसांनी व १५ दिवसांच्या अंतराने चार फवारण्या मॅन्कोझेब (o.३ टका) किंवा काबॅन्डॅझिम (o.१ टका) हे बुरशीनाशक व डायमेथोएट ३o ईसी १३ मिलि. किंवा लॅम्बडा सायहॅलोश्रीन ५ ईसी ६ मिलेि. किंवा क्रिनॉलफॉस २५ ईसी २४ मिलि.

या कीटकनाशकाच्या आलटूनपालटून फवारण्या कराव्यात. फवारणी करताना चिकट द्रवाचा (o.१ टका) वापर जरूर करावा. काढणी: जातीनुसार आणि हवामानानुसार कांदा पक्र होऊ लागला, की नवीन पाने यायची थांबतात.

पानांतील अन्नरस कांद्यामध्ये उतरू लागून कांदा घट्ट होतो. पाने पिवळसर होतात कांद्याची मान मऊ होते. पाने मानेजवळ वाकून जमिनीवर पडतात. साधारणपणे ५० टक्के झाडांच्या वाळविताना विशेषकरून एक खबरदारी घ्यावी, ती म्हणजे कांदा ढीग न करता पहिला कांदा दुस-या ओळीच्या कांद्याच्या पातीने झाकून जाईल, अशा पद्धतीने जमिनीवर एकसारखा पसरवून पाच दिवस वाळवावा.

त्यानंतर कांद्याच्या मानेला पीळ देऊन ३ ते ५ सेंमी. मान ठेवून पात कापावी. हे कांदे सावलीत दोन आठवडे पातळ थर देऊन सुकवावेत.कांदा आणि महाराष्ट्र महाराष्ट्रातील ३७ टक्के, तर देशातील १० टक्के कांद्याचे उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात होते. याशिवाय पुणे, जळगाव, धुळे, अहमदनगर, सोलापूर व सातारा या जिल्ह्यांतही १०.८७ लाख हेक्टर क्षेत्र असून, १७५.११ लाख टन उत्पादन मिळून १६.१० टन प्रतिहेक्टर उत्पादकता आहे.

अशा त-हेने योग्य सुकविलेल्या कांद्याची प्रतवारी करून फक्त मध्यम आकाराच्या कांद्याची साठवणूक करावी. कांद्याची काढणी फेब्रुवारी-मार्च (२० टक्के) आणि रब्बी एप्रिल- मे (६० टक्के) या महिन्यांत काढणीस येतो. सप्टेंबर-मे या कालावधीत कोणत्या तरी हंगामाची कांदाकाढणी चालू असते.

जून ते सप्टेंबरपर्यंत लागते. कांदा साठवण करावयाची असेल, तर एन-२-४-१ सारख्या जातींची निवड करणे, वरखते ६० दिवसांनंतर देऊ नयेत. काढणीपूर्वी ३ आठवडे पाणी तोडणे व योग्य प्रकारे सुकवणे.

साठवणुकीतील नुकसान :

साठवणुकीत कांद्याचे तीन प्रकारे नुकसान होते. योग्य प्रकारे साठवण केल्यास नुकसानाचे प्रमाण कमी कमी करता येते.

महत्वाच्या बातम्या : –

राजस्थानमध्ये शेतकऱ्यांना व्याजाशिवाय मिळणार कर्ज आणि 50 हजार सौरपंप

CZC-94 नवीन जातीचे जिरे 90 ते 100 दिवसात होईल तयार, लागवडीचा खर्च होईल कमी

खजूर शेतीसाठी उचला 75 टक्के अनुदानाचा लाभ

नस दाबली गेली असल्यास ‘हे’ घरगुती उपाय एकदा नक्की करून पहा

गायी व म्हशींमध्ये लम्पी आजाराची लक्षणे कशी ओळखता येणार ते जाणून घ्या

Leave a comment