‘या’ तारखेला शेतकरी संघटनांकडून देशव्यापी चक्का जाम आंदोलनची घोषणा
कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी अधिकच आक्रमक झाले असून, शेतकरी संघटनांनी आता देशव्यापी चक्का जामची घोषणा केली आहे. 6 फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटनांकडून देशव्यापी चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे.
6 फेब्रुवारीला दुपारी 12 ते 3 या वेळेत हे देशव्यापी चक्का जाम आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. राष्ट्रीय आणि राज्य मार्गांवर या दिवशी रास्ता रोको केला जाईल. संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
There will be a country-wide agitation on February 6; we will block roads between 12 pm and 3 pm, says Balbir Singh Rajewal, Bhartiya Kisan Union (R) pic.twitter.com/4o5tD6ckfR
— ANI (@ANI) February 1, 2021
तर दुसरीकडे, सरकारशी चर्चा करायला तयार असल्याचे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. सरकारने चर्चेद्वारे या समस्येतून मार्ग काढावा. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, किसान मोर्चाच्या ४० संघटनांची जी ४० सदस्यीय समिती आहे, समितीशी सरकारने चर्चा करावी, असे टिकैत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ट्रॅक्टर परेडच्या दिवशी झालेल्या हिंसाचारानंतर आता दिल्ली पोलीसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग देखील केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या : –
शरद पवार हे वरिष्ठ नेते आहेत, पण…
सिंधू सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांची संजय राऊत घेणार भेट
कृषी कायद्यांना मंजुरी मिळत असताना शरद पवार कुठे होते?
लँटाना कॅमरा म्हणजे काय? त्याचा वापर काय जाणून घ्या
फॅमिली फार्मिंग म्हणजे काय? जाणून घ्या