आंदोलन दरम्यान मृत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत नाही – नरेंद्रसिंह तोमर
गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली येथे आंदोलन सुरु आहे. आंदोलनाची धार अधिक तीव्र होताना आता दिसून येत आहे. या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना सरकार आर्थिक मदत देणार नसल्याचे कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलं. लोकसभेत शेतकरी आंदोलनासंदर्भात चर्चेचा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर कृषीमंत्री तोमर यांनी उत्तर दिले.
भारतीय किसान युनियनने दावा केला आहे की, आत्तापर्यंत 70 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा या आंदोलन दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामध्ये, थंडी आणि ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.
गडचिरोली येथील सिताबाई यांचाही याच दरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, सरकारने आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी दिली नाही, तसेच आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना सरकार आर्थिक मदत देणार नसल्याचे कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलं.
दरम्यान, कोरोनामुळे शेतकरी आंदोलनातील महिला व लहान मुलांना घरी पाठविण्यात यावं, असं आवाहन अनेकवेळा करण्यात आलं होतं, असेही कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यावेळी म्हणाले. आत्तापर्यंत शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चेच्या 11 फेऱ्या झाल्या असून अद्यापही मार्ग निघाला नाही.
दरम्यान, शेतकरी आंदोलकांची नाचक्की करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आता सिंघू सीमेवर दिल्ली पोलिसांनी चार ते पाच फुटांची भिंत उभारण्यात आली आहे. या भिंतीच्या पलिकडे पाच पदरी बॅरिकेट्स उभारण्यात आले आहेत. हे बॅकिरेट्स जवळपास १.५ किमी इतके दूरवर पसरले आहेत. या बॅरिकेट्समुळे शेतकरी आंदोलकांना दिल्ली जल बोर्डाच्या पाण्याच्या टँकर्सपर्यंत पोहोचता येत नाहीय. इतकंच नाही तर शेतकऱ्यांना मोबाइल टॉयलेट्सपर्यंतही पोहोचणं आता कठीण झालं आहे.
महत्वाच्या बातम्या : –
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गोंधळ
बॅरिकेट्समुळे शेतकऱ्यांना मोबाइल टॉयलेट्सपर्यंतही पोहोचणं कठीण
शेतीमधील जैविक खतांचे महत्व व प्रभावी वापर
शेती व शेततळ्यातील उपद्रवी उंदीरांचे नियंञण