एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडू देणार नाही – राजू शेट्टी

0

लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात वाढीव वीज बिल आले होते. अनेकांनी हे बील भरलेच नसल्याने आता महावितरणाने वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. वीज देयकाची मोठी थकबाकी असल्याने महावितरणाकडून हे पाऊल उचलण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे, राज्यातील शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली.

ते बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. वीजबिल माफीशिवाय आम्ही माघार घेणार नाही. एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडू देणार नाही. सरकारने शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे. शहरी असो किंवा ग्रामीण असो, महाराष्ट्रीतील 1 कोटी 35 लाख कुटुंबांना लाभ मिळू शकतो. ही माफी घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही, ही आमची भूमिका आहे.

या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबत आमची बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनादेखील काल आम्ही भेटलो. आम्ही सर्वांना निर्वाणीचा इशारा दिल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले होते.

दरम्यान, या मुद्यावर भाजप देखील आक्रमक झाले असून, शेतकरी आणि वीज ग्राहकांना वीज कापण्यासाठी राज्य सरकारने पाठवलेल्या नोटिसा मागे घ्या अन्यथा, येत्या 5 फेब्रुवारी रोजी राज्यात एमएसएईबीच्या कार्यालयांना टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या : –

पोलिसांकडे दुसरा पर्याय नव्हता, शेतकऱ्यांवर केलेल्या कारवाईचे गृहमंत्रालयाकडून समर्थन

आंदोलन करणारे शेतकरी नाहीत तर दहशतवादी – कंगना रनौत

कृषि क्षेत्रातील ‘या’ व्यक्तींना पद्म पुरस्कार

केसर आंबा लागवड पद्धत

उन्हाळ्यात जनावरांना होणारे आजार आणि त्यावरील उपाययोजना

Leave a comment