सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांवर मावा तुडतुडा रोगाचे नवीन संकट

0

परतीच्या पावसामुळे बेजार झालेल्या सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांवर मावा तुडतुडा रोगाचे नवीन संकट निर्माण झाले आहे. या रोगामुळे उभ्या धान पिकांना जाळण्याचे प्रयत्न आता शेतकरी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे. सिहोरा परिसरात अनेक संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे. मार्च महिन्यापासून शेतकरी संकटात आहे. लॉकडाऊन नंतर शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे चौपट झाली आहे.

नद्यांचे खोऱ्यात असल्याने सुपीक शेतीचा शिक्का त्यांचे शेतीवर आहे. परिसरात पाण्याची कमतरता नाही. परंतु अस्मानी संकट त्यांना जगूच देत नाही. खरीप हंगामात धान पिकाची लागवड करण्यात आली असता, नद्यांचे पुराचे पाणी गाव आणि शेतशिवारात शिरले. एक नव्हे तब्बल चार दिवस पुराचे पाण्याने थैमान घातले.उभ्या धान पिकांची तणस झाली. काही प्रमाणात पीक शिल्लक होते. या धान पिकावर विविध रोगाने ताव मारण्यास सुरुवात केली.

धान पीक कापणीच्या तोंडावर असताना मोठा आघात मावा तुडतुडा रोगाने दिला आहे. हातात येणारे पीक जाताना उघड्या डोळ्यांनी पाहताना शेतकऱ्यांचे डोळ्यात अश्रू आहेत. परंतु काहीच करता येत नाहीत. शासन अंतर्गत मदतीची अपेक्षा आहे. याच परिसरात मावा तुडतुडा रोगाने उभे धान पीक नष्ट केले होते.

 

Leave a comment