नवीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे – राजनाथ सिंह

0

कृषी कायद्यांविरोधांत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना आणि सरकारच्या प्रतिनिधींमध्ये काल म्हणजेच २२ जानेवारी २०२१ रोजी बैठक संपन्न झाली. ही बैठक निष्फळ ठरली आणि त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. सरकारने शेतकरी संघटनांना खडे बोल सुनावले आहेत. शेतकऱ्यांना सर्व पर्याय दिले गेले आहेत. आता प्रस्ताव मान्य असेल तरच आता पुढची बैठक होईल, असं सरकारने स्पष्ट केलं आहे.

यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. नवीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत आणि यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात तीन पट वाढ होईल, असं राजनाथ सिंह म्हणाले.

शेतीबद्दल आपल्याला माहिती आहे. जे विधेयक आहेत आणि कायदे केले आहेत, ते शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दोन पटीने अधिक वाढेल. तरीही शेतकऱ्यांना समस्या असल्यास कोणत्याही कलमात अडचण असेल तर ते मुद्दे सांगा, आम्ही दुरुस्तीसाठी तयार आहोत, असं राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या : –

‘प्रस्ताव मान्य असेल तरच आता पुढची बैठक होईल’

राज्यात ‘या’ तारखेला पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता

२४ तासांत नागपूरच्या तापमानात ५ अंशाची घसरण

लिंबू लागवडी विषयी माहिती

26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅली होणारच – कॅप्टन अमरिंदर सिंग

 

Leave a comment