मागणी अभावी नागपूरच्या संत्रा दरात घसरण

0

मागणी अभावी नागपूरच्या संत्रा दरात घसरण झाली आहे. कळमना बाजार समितीत ११०० ते १३०० रुपये क्विंटल दराने संत्र्याचे व्यवहार होत असल्याची माहिती समोर अली आहे. केवळ संत्राचं नाही तर मोसंबी दरही खाली  गेले आहे. गेल्या महिन्यातील ३२०० ते ३६०० रुपयांवरून २१०० ते २५०० रुपये क्विंटलने मोसंबीचे व्यवहार होत आहेत.

नोव्हेंबर महिन्यात मोसंबीचे दर ३६०० ते ४ हजार होते. मोसंबीची आवक एक हजार क्विंटलची होती. या आठवड्यात मोसंबीचे दर घसरत थेट २१०० ते २५०० रुपयांवर पोहोचले. आवक ही कमी होत अवघ्या ३० क्विंटलवर पोहोचली आहे. बाजारात द्राक्ष ५००० ते ६००० क्विंटल होते. आवक ३९ क्विंटल नोंदविण्यात आली.

टोमॅटोला १८०० ते २००० रुपये असा दर मिळत आवक १६० क्विंटल झाली. बाजारात हरभरा आवक १५८ क्विंटल होती. ४३०० ते ४७०० रुपये असा दर मिळाला. सोयाबीनचे व्यवहार ३८०० ते ४२२० रुपयांनी झाले. बाजारात बटाट्याची २८७३ क्विंटल आवक झाली. बटाट्याचे दर २५०० ते ३५००.रुपये होते. कांदा दरात काहीशी घसरण नोंद झाली.

सोयाबीनची आवक वाढली असून गेल्या आठवड्यात ७६२ क्विंटलवरुन या आठवड्यात १४४४ क्विंटलवर आली आहे. भुईमूग शेंगाचे व्यवहार ४५०० ते ५००० रुपये क्विंटलने झाले.डाळिंबांची आवक ३५० क्विंटल असून दर दोन हजार ते सहा हजार असे राहिले. पांढरा कांदा ४००० ते ४४०० रुपये क्विंटल होता. या आठवड्यात कांदा दर ३००० ते ४००० रुपये झाले. लसणाची आवक ३७० क्विंटल असून ५००० ते ७५०० रुपये असा दर मिळाला.

संत्रा लागवडीखाली विदर्भात सुमारे दीड लाख हेक्‍टर क्षेत्र आहे. यावर्षी पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे संत्र्यावर अपेक्षित रंगधारणा झाली नाही. त्यासोबतच देशाच्या इतर भागात देखील पाऊस होता. परिणामी संत्र्याला मागणी नव्हती. अशा विविध कारणांमुळे कळमना बाजार समितीत दरात घसरण अनुभवली जात आहे. गेल्या आठवड्यात मोठ्या आकाराच्या संत्रा फळाला ११०० ते १३०० रुपये असा दर मिळाला. संत्र्याची आवक ५००० क्विंटल होती. मोसंबी दरातील तेजी संपुष्टात आली आहे. मात्र संत्र्यापेक्षा मोसंबीला अधिक दर असल्याने काहीसे समाधान होते.

 

Leave a comment