अभिनेत्याने शेतकऱ्यांच्या परिस्थितीला पंडित नेहरूंना धरले जबाबदार

0

गेली अनेक दिवसांपासून शेतकरी नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या आंदोलनला काहीजण समर्थन देत आहेत, तर याबाबत वादग्रस्त वक्तव्य देखील करत आहेत. सिनेक्षेत्रातून देखील या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया येताना दिसत आहे. सुपरहिरो शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना यांनी आता असेच वक्तव्य करून, शेतकऱ्यांच्या सध्याच्या परिस्थितीला थेट देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरले आहे.

मुकेश खन्ना यांनी एका युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनावर भाष्य केले आहे. . गेल्या ७० वर्षांपासून देशात हेच सुरु आहे त्यावेळी नेहरूंनी शहरीकरणाला महत्व दिलं नसतं तर आज देशाची ही अवस्था नसती, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

मुकेश खन्ना म्हणाले की, जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आजतागायत शेतकऱ्यांच्या त्याच समस्या आहेत. गेल्या ७० वर्षात शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली नाही. अन् याला आपल्या देशाचं धोरण आहे. ज्यावेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळी जवाहरलाल नेहरूंनी शहरीकरणाला प्राधान्य दिलं. त्याऐवजी त्यांनी खेड्यांना सक्षम केलं असतं तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. देशातील 75 टक्के भाग खेडी आणि गावांनी व्यापला आहे. आपण त्यांच्या विकास करायला हवा.

लोकांना वाटतं मी भाजपा पाठिंबा देतोय पण हे खोटं आहे. मी कायम शेतकऱ्यांच्या बाजूने उभा असल्याचे देखील ते व्हिडीओत म्हणाले.

Leave a comment