महाराष्ट्रात गाळपासाठी अजून ४१२ लाख टनांपेक्षा जास्त ऊस उपलब्ध

0

महाराष्ट्रामधील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५३४ लाख टन ऊस गाळला आहे. मात्र गाळपासाठी अजून ४१२ लाख टनांपेक्षा जास्त ऊस उपलब्ध आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

यंदा १८२ कारखान्यांनी धुराडी पेटवली आहेत. यात ९२ सहकारी आणि ९० खासगी कारखान्यांचा समावेश आहे.नगरमधील २५ कारखान्यांनी ८.९३ टक्के उतारा ठेवत ७०.७८ लाख क्विंटल साखर तयार केली आहे तर कोल्हापूरमधील ३७ कारखान्यांनी १२५.९२ लाख टन ऊस गाळून १४२.६७ लाख क्विंटल साखर तयार केली असल्याचे माहिती देण्यात आली आहे.

दुसरीकडे, नांदेड विभागात २४,अमरावतीला दोन, तर नागपूर भागात यंदा तीन साखर कारखाने चालू आहे. दुष्काळी औरंगाबाद भागात आतापर्यंत २१ कारखान्यांनी ४५.३१ लाख टन ऊस गाळला. तेथे ३८.७९ लाख क्विंटल साखर तयार होऊन ८.५६ टक्के उतारा मिळाला आहे.

पुणे विभागात १०.०९ टक्के उतारा ठेवत आतापर्यंत ११८.७९ लाख क्विंटल साखर तयार केली आहे. कोल्हापूरचा उतारा राज्यात सर्वाधिक असून, तो ११.३३ टक्के आहे. ३० कारखान्यांनी ११७.६९ लाख टन गाळप केले आहे.

महत्वाच्या बातम्या : –

कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध

शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी काही उपाय

जोपर्यंत आमच्या बाजूने निकाल लागणार नाही पर्यंत लस घेणार नाहीत

ढोबळी मिरचीला होणारे रोग आणि त्यावरील उपाय

 

Leave a comment