मोदींच सरकार हे विसरले आहे की प्रजा राजा आहे आणि आपण सेवक – बच्चू कडू

0

दिल्लीच्या सिमेवर गेल्या अनेक दिवसांपासून शेतकर्यांचे आंदोलनं सुरु आहे. त्यातून अपेक्षा होत्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करतील. पण तसे झाले नाही कारण पंतप्रधान मोदींचा हेखेखोर पना आडवा आला अशी जहरी टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कृषी कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.

मुंबईत राज्यपाल यांच्या घराला सर्वपक्षीय नेते हे घेराव घालणार आहे. ही आनंदाची बाब आहे. अस प्रथमच होत आहे. त्यामुळे शेतकरी राजाचा विजय झाला आहे. आता राज्यपाल यांनीही राष्ट्रपती यांना कळवून हे कायदे रद्द करावे अशी मागनीही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.

मोदींच सरकार हे विसरले आहे की प्रजा राजा आहे आणि आपण सेवक आहे. परंतु आता प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून आम्हाला अपेक्षा की शेतकरी राज्याने कृषी कायदा संदर्भात ज्या मागण्या केल्या त्या पूर्ण कराव्या अन्यथा देशभरात उग्र आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही असं राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : –

पूर्व विदर्भातील ‘या’ भागात पाऊस पडण्याची शक्यता

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा

शेतकऱ्यांचा जत्था आझाद मैदानात दाखल, आझाद मैदानात किसान मोर्चाची भव्य सभा

भेंडीचे १० गुणकारी फायदे

सेंद्रिय शेती

 

Leave a comment