राज्यातील किमान तापमानात चढउतार

0

राज्यातील किमान तापमानात चढउतार होत असल्याचे पहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्रात असलेल्या कोरड्या वातावरणामुळे थंडी वाढली आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा पुन्हा खाली आला आहे. येत्या चार ते पाच दिवस थंडी कायम राहणार असल्याचे बोलेल जात आहे. गेल्या २४ तासतात निफाड येथे नीचांकी ८.५ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात थंडी कायम असून किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. कोकणात बऱ्यापैकी थंडी असल्याने किमान तापमान १५ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक, जळगाव भागात चांगलीच थंडी आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर भागातही किंचित थंडी आहे.

मराठवाड्यात थंडी कमीअधिक प्रमाणात आहे.  विदर्भातही काही प्रमाणात थंडी आहे. गेल्या दोन दिवसापासून मराठवाडा ते बिहारचा पश्चिम भाग या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. हा पट्टा झारखंड, छत्तीसगड आणि विदर्भ या दरम्यान असून समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. मात्र, हा पट्टा फारसा सक्रिय नसल्याने राज्यातील अनेक भागात हवामान कोरडे आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात चढउतार होत असल्याचे पहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या : –

राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दररोज वाढ

रॅली संपायला तीन दिवस देखील लागू शकतात

… म्हणून राज्यपाल शेतकऱ्यांना भेटू शकले नाहीत, राजभवनाचे स्पष्टीकरण

राज्यपालांकडे कंगनाला भेटायला वेळ आहे, पण शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही – शरद पवार

मुंबईतील मोर्चा शेतकऱ्यांचा नसून काही पक्ष ढोंगबाजी करत आहेत ;फडणवीसांचा आरोप

 

Leave a comment